बोराडी । Boradi वार्ताहर
बोराडी ग्राम परिषदेतर्फे (Boradi Gram Parishad) माझी वसुंधरा अभियानात (My Vasundhara Campaign)-3.0 अंतर्गत गावासह परिसरातील जुनी व नवीन लावलेली वृक्षांची गणना (Enumeration of trees) करण्यात आली असून यात विविध प्रजातींचे सुमारे बेचाळीस हजाराच्या जवळपास वृक्षांची गणना झाली आहे. यात काही स्वातंत्र्यपूर्व काळातील वृक्ष असून सव्वाशे ते शंभर वर्षांच्या वरील असल्याचे नोंद करण्यात आली आहे. तसेच दरवर्षी बोराडी ग्राम परिषद गावात पाच हजारांवर वृक्षारोपण व संगोपन करीत आहे.
बोराडी गावाची खरी ओळख मोठ-मोठी वृक्ष व शाळेमुळे होते. कारण गावात प्रवेश करतानाच प्रचंड वृक्ष लागवडीचे क्षेत्र दिसून येत असल्याने हेच बोराडी गाव असल्याचे समजते. बोराडी गावात व जवळपास ग्रामपंचायत व वन विभागाच्या रोपवाटिका असून या रोपवाटिकेतून दरवर्षी हजारो झाडांचे परिसरात वृक्षारोपण करण्यात येते यामुळे या परिसराला नंदनवन सारखे रूप आलेले दिसून येत आहे.
बोराडीसह परिसरातील वृक्षांची गणना करण्याचे काम माझी वसुंधरा अभियानांतर्गत करण्यात येत असून यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील वृक्ष असल्याचे दिसून येत आहे. यात सव्वाशे ते शंभर वर्षांच्या वरील असल्याचे नोंद असून वडाची 38, पिंपळ 170, आंबे 1721, चिंच 253, निंब 11335, निलगिरी 4342, सांग, पळस, अशोक, बेल, जांभुळ, बोर, गुलमोहर, महू, शिशु, ताळी, बांबू, सिसम, सुळबाबुळ, सिताफळ, चिकू, नारळ, शेवगाव, यांच्यासह विविध प्रजातींचे सुमारे बेचाळीस हजाराच्या जवळपास वृक्षांची गणना झाली आहे.
यामध्ये सव्वाशे वर्षाच्या वरील महुच्या झाडांची रुंदी सुमारे पावणेसात मीटर व लांबी 58 फूट तर वडाच्या झाडाची रुंदी सहा मिटर व लांबी बेचाळीस फुट इतकी नोंद करण्यात आली आहे. दरवर्षी बोराडी ग्राम परिषद गावात पाच हजारांवर वृक्षारोपण व संगोपन करीत आहे.
बोराडी परिसरात तसेच अंबाड नदी परिसरात अनेक प्रकारची फुलझाडे, फळझाडांचे रोपण केले असुन नदीत बोटींगची सुविधा आहे. बोराडी ग्रामपरिषद क्षेत्रात पर्यावरण संतुलनासाठी जि.प. आरोग्य केंद्र, मातोश्री बनुमाय उद्यान, हनुमान मंदिर परिसर, देव मोगरा कॉलनी, अमरधाम, उपोषणा केंद्र, नवीन पाण्याची टाकी परिसर आदी भागांमध्ये वृक्षारोपण करुन हरित क्षेत्रांची निर्मिती केली असुन अनेक प्रकारचे झाडे लावली आहेत.त्यामुळे पर्यावरण संतुलनात मदत झाली आहे.