मंगेश पाटील
बोरद । Borad
परिसरातील शेतकर्यांच्या केळी (Bananas) पिकाला दिल्ली, जम्मू कश्मीर, राजस्थान, हरियाणा, उत्तरप्रदेश (North India), नेपाळ (Nepal) येथून मागणी होत आहे. विशेष म्हणजे नवतीला प्रति क्विंटल अडीच ते तीन हजाराहून अधिक भाव मिळत असल्याने शेतकर्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
शिरपूरात तरूणाचा निर्घुण खून
दोन अडीच वर्षांपूर्वी कोरोना काळात शेतकर्यांच्या केळी, पपई, यासारख्या पिकांना अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. त्यामुळे शेतकर्यांनी या पिकाकडे पाठ फिरवली होती. मात्र, गतवर्षीच्या हंगामात केळी पिकाला समाधानकारक भाव मिळाल्याने यावर्षी नंदुरबार जिल्ह्यात केळी लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
यावर्षी डिसेंबर महिन्यातील बागेचा काढणीपासून केळीचा भाव दीड हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होता. मात्र सद्यस्थितीत घाऊक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर केळीला मागणी वाढल्याने पील बागेलाही प्रतिक्विंटल सतराशे ते दोनहजार रुपये पर्यंत भाव मिळत आहे. नवती जातीच्या केळीची अडीच ते तीन हजार रुपये भावाने व्यापारी वर्गाकडून खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित सुधारण्यास मदत होत आहे. त्याच्या परिणाम सध्या बोरद परिसरातील लग्नसराईवरही दिसून आला आहे.
रेल्वे खाली आल्याने युवकाचा मृत्यू
तळोदा तालुक्यातील बोरद गावात केळी व पपईची खालिद तेली, इस्माईल तेली, भैय्या राजपूत, दीपक पाटील या प्रमुख व्यापार्यांकडून खरेदी केली जाते.
दरम्यान, केळी व्यापारी खलील तेली यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, सध्या दररोज बोरद परिसरातून 20 ते 25 गाड्या केळी भरत असून एक गाडी साधारणता पाच लाखापर्यंत जात आहे. तसेच बोरद परिसरातील केळीला सध्या जम्मू कश्मीर, राजस्थान, हरियाणा, उत्तरप्रदेश, दिल्ली, नेपाळ आदी ठिकाणच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी होत असल्याचेही सांगितले. सध्या बोरद परिसरातील अनेक शेतकर्यांची नवती बागेची केळी अजूनही निघालेली नाही.
केळीला यावर्षी अधिक भाव मिळत असल्याने शेतकर्यांकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आपल्या बागेत चांगल्या प्रतीची केळी तसेच वजनदार घड कसे तयार होतील यावर भर दिला जात आहे. केळी लागवडीचा एकरी खर्च वाढल्याने भविष्यात केळीचे दर कमी होऊ नयेत तसेच अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ वारा याच्यातून केळीचे नुकसान होऊ नये, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
केळीला प्रति क्विंटल 3500हुन अधिक भाव मिळण्याची शक्यता
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत केळीला मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. नजीकच्या काळात हा दर साडेतीन हजारहुन अधिक होऊ शकतो.
यावर्षी सुरुवातीपासून केळीला चांगला भाव असल्याने डिसेंबर महिन्यापासूनच शेतकर्यांनी केळीच्या रोपांची मार्च, एप्रिल, मे, जून या चार महिन्यांची बुकिंग करून ठेवली आहे. फक्त वेळेवर रोपे उपलब्ध होणे गरजेचे आहे. गतवर्षी शेतकर्यांनी चार महिने अगोदर बुकिंग करूनही वेळेवर केळीची रोपे उपलब्ध न झाल्यामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. केळी लागवडीसाठी एकरी एक लाख रुपये खर्च होत असून उत्पादन दोन ते अडीच लाखापर्यंत येत आहे.
– जितेंद्र रघुनाथ पाटील शेतकरी, बोरद