Tuesday, March 25, 2025
Homeनाशिकप्रेमप्रकरणातील वादातून दोघांचा मृत्यू

प्रेमप्रकरणातील वादातून दोघांचा मृत्यू

तीन सख्ख्या भावांसह पुतण्या गजाआड

- Advertisement -

सुरगाणा । प्रतिनिधी surgana

पायरपाडा हतगड येथे तीन सख्खे भाऊ व पुतण्या या चौघांनी मिळून वृद्धाला दांडक्याने मारझोड केल्याने वृध्द ठार झाल्याने या चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि.11 जुलै रोजी संशयित आरोपी पांडुरंग रामू बागुल (40), गोपाळ रामू बागुल (55), चंदर रामू बागुल (53), सोमनाथ चंदर बागुल (30) सर्व राहणार हतगड यांनी मयताची वृद्ध पत्नी भीमाबाई देवराम गावित (57) व मयत देवराम हरी गावित (64) रा. यांना दांडक्याने बेदम मारझोड केल्याने 12 जुलै रोजी वृध्दाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

या मागील हकीकत अशी की आरोपींचा मयत पुतण्या वासुदेव यशवंत बागुल (22) व मयत वृद्ध देवराम गावित यांच्या नात्यातील एका मुलीशी प्रेम प्रकरण होते. ही मुलगी व आरोपींचा पुतण्या हे एकाच गावातील होते. 11 जुलै रोजी वासुदेव बागुल यांने प्रेम विरहातून ओढणीने रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या हत्या केली होती.

याचाच राग आरोपींनी मनात धरून तुमच्याच मुळे आमच्या पुतण्याने आत्महत्या केली म्हणून चौघांनी दांडक्याने मारझोड केल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याने 14 जुलै 2024 रोजी चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना पोलीस कोठडी दिली आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित पाटील, शिवराम गायकवाड, चेतन बागुल, कैलास मानकर, जगदीश घुटे, अनिल चारोस्कर आदी तपास करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला 1800 रुपये भाव मिळाला. मंगळवारी बाजार समितीत 2522 कांदा (Onion) गोण्यांची आवक झाली....