Monday, November 16, 2026
Homeक्राईमडांबून ठेवलेल्या 8 गोवंशीय जनावरांची सुटका

डांबून ठेवलेल्या 8 गोवंशीय जनावरांची सुटका

गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi

नेवासा तालुक्यातील चांदा येथे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या आठ गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुटका केली. या कारवाईत सुमारे 1 लाख 15 हजार रुपये किमतीची 8 गोवंशीय जनावरे ताब्यात घेण्यात आली असून, याप्रकरणी तिघांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, संशयित आरोपी कारवाईदरम्यान मिळून आले नसल्याने त्यांचा शोध सुरू आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये व पोलीस अंमलदारांचे पथक तयार करून अवैध धंद्यांची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

दरम्यान, रविवार दि. 15 नोव्हेंबर रोजी हे पथक सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना चांदा गावात गोवंशीय जनावरे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली. चांदा येथील खंडोबा मंदिराजवळील काटवनात, पत्र्याच्या शेडच्या आडोशाला तसेच चांदा ते कुकाणा रस्त्यालगत जनावरे ठेवल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला असता आठ गोवंशीय जनावरे डांबून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ या जनावरांची सुटका करून त्यांना ताब्यात घेतले.

या जनावरांची एकूण किंमत 1 लाख 15 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदरील जनावरे ही अयनाज मोबीन शेख, आशकान अमिन शेख आणि नबाब गुलाब शेख (तिघेही रा. चांदा) यांच्या मालकीची असून, ते घटनास्थळी मिळून आले नाहीत. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 489/2026 अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1995 (सुधारित 2015) मधील कलम 5(अ), 5(ब), 9 आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे, बाळासाहेब नागरगोजे, अशोक लिपणे, शामसुंदर जाधव, मनोज साखरे, अमोल कोतकर व किशोर शिरसाठ यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

Crime News : अत्याचारातून जन्मलेल्या अर्भकाला रस्त्यावर टाकले

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar बाराबाभळी (ता. अहिल्यानगर) शिवारातील बायपास रस्त्यालगत नवजात अर्भक बेवारस अवस्थेत आढळून आल्याच्या प्रकरणाचा भिंगार कॅम्प पोलिसांनी छडा लावला आहे. पीडित तरूणीवर अत्याचार...