Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाCricket Viral News : गोलंदाजाने एका चेंडूत दिल्या तब्बल १८ धावा; टी-२०...

Cricket Viral News : गोलंदाजाने एका चेंडूत दिल्या तब्बल १८ धावा; टी-२० क्रिकेटमधील सर्वात महागडा चेंडू, पाहा Video

नवी दिल्ली | New Delhi

क्रिकेटमध्ये (Cricket) कधी काय घडेल याचा काही नेम नाही. एखाद्या सामन्यात कधी कधी १ धाव करणेही मुश्कील होते. तर कधी एका षटकात ३६ धावाही (Run) केल्या जातात. मात्र, आता क्रिकेटमध्ये एका गोलंदाजाने चक्क शेवटच्या एका चेंडूवर ४,६ नव्हे तर तब्बल १८ धावा दिल्या आहेत. त्यामुळे त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे…

- Advertisement -

रील्स बनवणं बेतलं जीवावर; विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

सध्या तामिळनाडू प्रिमिअर लीग (Tamil Nadu Premier League) सुरु असून या लीगमध्ये सालेम स्पार्टन्स आणि चेपॉक सुपर गिलीज यांच्यात एक सामना खेळला गेला. यावेळी सालेम स्पार्ट्न्सचा अभिषेक तंवर (Abhishek Tanwar) हा गोलंदाजी करत होता. तर चेपॉक सुपर गिलीजचा संजय यादव (Sanjay Yadav) हा फलंदाजी करत होता. तंवर याने २० व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर संजय यादव याचा त्रिफाळा उडवत त्याला बाद केले. पंरतु, तो नो बॉल असल्याचे समोर आले.

त्यानंतर संजय यादवला फ्री हिट मिळाला. त्या चेंडूवर त्याने षटकार (Six)मारला. विशेष म्हणजे अभिषेक तंवर याने फेकलेला फ्री हीट देखील नो बॉलच होता. यानंतर अभिषेक तंवर याने लागोपाठ तीन नो बॉल फेकले आणि एक वाईड बॉल फेकला. अशा अतिरिक्त चार धावा चेपॉक सुपर गिलीज संघाला मिळाल्या. तर पहिल्या फ्री हीटवर संजय यादव याने षटकार आणि दुसऱ्या फ्री हीटवर दोन धावा काढल्या. तसेच अखेरच्या फ्री हीटवर संजय यादवने षटकार मारला. त्यामुळे चेपॉक सुपर गिलीज संघाने एका चेंडूवर १८ धावा कुटल्या.

“वादग्रस्त मंत्र्यांच्या…,” शिवसेनेच्या नव्या जाहिरातीवरून अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

दरम्यान, या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर चेपॉक सुपर गिल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २१७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सलेम स्पार्टन्स संघाला (Team) १६९ धावा करता आल्या. तसेच याआधी वर्ल्ड क्रिकेटमध्ये हा विक्रम क्लिंट मॅकॉय याच्या नावावर आहे. क्लिंट मॅकॉय याने २०१२-१३ मध्ये एका चेंडूवर २० धावा दिल्या होत्या.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या