Saturday, May 4, 2024
Homeधुळेमस्ताना मणुका नावाच्या भांगच्या गोळ्यांचे डबे जप्त

मस्ताना मणुका नावाच्या भांगच्या गोळ्यांचे डबे जप्त

धुळे । Dhule। प्रतिनिधी

मुंबई- आग्रा महामार्गावरील पनाखेड (Panakhed) गाव शिवारात पोलिसाांनी (police) सापळा (Trapped) रचून भांग मिश्रीत गोळ्यांची (Cannabis mixed tablets) वाहतूक करणार्‍या वाहनाला पकडले. चालकाला ताब्यात घेत मस्ताना मणुका (Mastana Manuka) स्पेशल नावाच्या भांग मिश्रीत गोळ्यांचे 44 डबे व वाहन असा एकुण 5 लाख 7 हजार 920 रूपयांचा मुद्येमाल जप्त (Confiscated) करण्यात आला.

- Advertisement -

सेंधवाकडून शिरपुरकडे एको पिकअप गाडीतून (क्र. एमपी-46-जी-2349) बेकायदा भांग मिश्रीत नशेच्या गोळयांची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती शिरपूर तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार सपोनि सुरेश शिरसाठ यांच्यासह पथकाने काल सायंकाळी पनाखेड गावाचे पुलाजवळ सापळा लावला.

साडेपाच वाजेच्या समारास सेंधवाकडून शिरपुरकडे संशयीत वाहन येतांना दिसले. वाहनाला थांबवत चालका त्याचे नाव विचारले असता त्यााने नानीराम धरमसिंग ऊर्फ मुन्ना भुगवाडे (वय 35 रा.बेडीफल्या घेरु घाटी ता.वरला जि.बडवाणी, मध्यप्रदेश) असे सांगीतले. वाहनातील मालाबाबत विचारपुस केली असता त्याने किराणा माल असल्याचे सांगीतले.

वाहनातील माल तपासला असता त्यात दोन संशयास्पद खोके दिसून आले. त्याबाबत त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. तेव्हा खोके उघडून पाहीले असता त्यात भांग मिश्रीत नशायुक्त गोळया दिसुन आल्या.

एकुण 7 हजार 920 रुपये किंमतीचे मस्ताना मणुका स्पेशल असे लेबल असलेले 44 प्लॉस्टीकचे डबे (प्रती डब्यात एकुण 180 भांग मिश्रीत नशायुक्त गोळया) व 5 लाखांचे वाहन जप्त करण्यात आले. याप्रकरणी संशयीत आरोपीविरुध्द शिरपुर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि सुरेश शिरसाठ, असई डी.टी. बाविस्कर, पोहेकॉ मोरे, जाधव, पोकॉ सिध्दांत मोरे, सईद शेख यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या