Sunday, September 22, 2024
Homeदेश विदेशदे दणादण! मुलाने चोरांनाच धू-धू धुतलं; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

दे दणादण! मुलाने चोरांनाच धू-धू धुतलं; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

- Advertisement -

सोशल मीडियावर दर दिवशी कुठली नी कुठली घटना व्हायरल होत असते. आजकाल सर्वत्र चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दिवसाढवळ्या देखील मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचे चित्र आहे. चोरीच्या घटनांचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. असाच एक चोरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान धुमाकुळ घालत आहे. मात्र यंदा व्हायरल झालेला व्हिडीओ थोडा वेगळा आहे…

व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसून येत आहे की, चोरीच्या घटनांमध्ये शक्यतो चोर चोरी करुन पळून जातात. चोर समोरच्या व्यक्तीला दुखापत करत असल्याचे देखील अनेकदा दिसून आले आहे. मात्र व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही उलटेच घडलेले आहे.

एक मुलगा आणि मुलगी रस्त्याच्या कडेला चालत आहेत. अचानक दुचाकीवर दोन चोर त्यांच्यासमोर येऊन त्यांना त्यांना लुटण्याचा प्रयत्न करतात. दुचाकीवर मागे बसलेला चोर मुलीच्या हातातून काहीतरी हिसकावतो.

तर दुसऱ्या दुचाकीवरील चोराने मुलाला घाबरवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. मात्र मुलगा या चोरांना अजिबात घाबरत नाही. उलट मुलीला लुटणाऱ्या चोरांना तो बेदम मारहाण करतो.

मालकीणीच्या घरातील दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

गाडीवरील चोराला पकडण्याचाही तो मुलगा प्रयत्न करतो. मात्र गाडीवरील चोर फरार होतो. मुलगा त्याच्या हाती लागलेल्या चोराला चांगलाच चोप देतो. मुलाने चोराला चोप दिलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धिंगाणा घालत आहे. व्हिडीओ अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या