Friday, November 15, 2024
Homeनाशिकमेहुणे ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

मेहुणे ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

गेल्या दोन ते तीन वर्षापासून दुष्काळी अनुदान पदरी न पडलेल्या तसेच पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रशासन यंत्रणेने सातत्याने मागण्या करून देखील या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेर्धात मालेगाव तालुक्यातील मेहुणे ग्रामस्थांनी दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

- Advertisement -

ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार आता निर्णय टाकल्याची माहिती मिळताच अप्पर जिल्हाधिकारी प्रांत तहसीलदार गट विकास अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी मेव्हणे गावी धाव घेत ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला दुष्काळी अनुदानासह पाण्याच्या समस्या संदर्भात येथे आठ दिवसात बैठक घेऊन तोडगा काढला जाईल असे आश्वासन अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आले.

मात्र, या समस्या संदर्भात अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा अधिकाऱ्यांनी तोडगा काढला नाही ग्रामस्थांच्या भावनांकडे दुर्लक्ष केले व कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळे आगामी काळात अधिकारी दखल घेतील याची काय श्वास्वती असा जाब संतप्त ग्रामस्थांनी विचारत मतदानावर बहिष्काराचा निर्णय कायम ठेवला असल्याचे समजते

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या