Monday, May 27, 2024
Homeनाशिकग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी Pimpalgaon Basvant

पिंपळगाव बसवंत ( Pimpalgaon Basvant ) शहराचा अलीकडच्या दहा वर्षांत वाढत गेलेला विस्तार आणि त्याच प्रमाणात वाढत गेलेली लोकसंख्या याचा विचार करता पिंपळगाव ग्रामपालिकेचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये ( Nagarparishad )करण्याची मागणी होत आहे. यासाठी येथील शगुन लॉन्समध्ये सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांच्या उपस्थितीत सहविचार सभेत एकमुखाने नगरपरिषदेची मागणी करण्याचा ठराव करण्यात आला.पिंपळगावला नगरपरिषद दर्जा दिला नाही तर ग्रामपालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा सर्वानुमते निर्णय यावेळी घेण्यात आला.

- Advertisement -

येथील सहविचार सभेचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते जयंत मुथा यांनी केले होते. याप्रसंगी आमदार दिलीप बनकर, निफाड एज्युकेशनचे उपाध्यक्ष भास्कर बनकर, सरपंच अलका बनकर, मविप्र उपाध्यक्ष विश्वास मोरे, पिंपळगाव मर्चंट बँक संचालक अशोक शाह, मविप्र माजी संचालक दिलीप मोरे, समता परिषदेचे सुरेश खोडे, राजा गांगुर्डे, गणेश बनकर, मनसेनेचे संजय मोरे आदी उपस्थित होते. यावेळी जयंत मुथा यांनी सहविचार सभेचा उद्देश स्पष्ट केला. भाजपचे बापू पाटील म्हणाले की, आता होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकावा. ती काळाची गरज असल्याची भूमिका मांडली.

ग्रा.पं. सदस्य गणेश बनकर म्हणाले, नगरपरिषद होत असताना गाव म्हणून सर्व त्या ठिकाणी उभे राहू. लगतच्या नगरपरिषदांमध्ये नगरविकास विभागाकडून दुप्पटीने निधी मिळत आहे. त्यामुळे दीड महिन्यांनी होऊ घातलेल्या ग्रा.पं. निवडणुकीत कुणीही अर्ज न भरता बहिष्काराचे अस्त्र वापरावे, अशी भूमिका मविप्र माजी संचालक दिलीप मोरे, सुरेश खोडे, अशोक शाह, दिगंबर लोहिते, राजा गांगुर्डे आदींनी घेतली. बांधकाम व्यावसायिक रफिक शेख म्हणाले, नगरपरिषद झाल्यास भव्य इमारती उभ्या राहून एफएसआय वाढवून मूल्यांकनाचे दर कमी असतील.

सध्याची स्थिती नगरपरिषदेसाठी सर्वाधिक अनुकूल असल्याचे प्रा.मोरे यांनी सांगितले. यावेळी भास्कर बनकर म्हणाले की, कालावधी कमी आहे. त्यामुळे इतक्या कमी वेळात तांत्रिकदृष्ट्या नगरपरिषद होणे शक्य नाही. त्यामुळे पुढील ग्रामसभा मोकळ्या जागेत घ्यावी आणि ठराव करावा. नगरपरिषद करायचीच असेल तर कोणाच्याही मनात निवडणूक फॉर्म भरण्याचा विचार येणार नाही. राज्यात 42 नगरपरिषदा प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रत्येकाने इतर नगरपालिकेची माहिती घेऊन घरपट्टी आणि नळपट्टी याची माहिती घ्यावी. नगरपरिषद होण्यासाठी सहकार्य करावे.

आमचा गट गावाच्या विकासासाठी सर्वांच्या सोबत आहे. यावेळी आमदार दिलीप बनकर म्हणाले की, गावाच्या विकासासाठी संपूर्ण पिंपळगावकर नगरपरिषदेसाठी एकत्र येतील. मात्र, नगरपरिषद करत असताना सर्व बाजू समजावून घेत सामान्य नागरिकांना कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. याविषयी पुन्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा आपण करू. असे प्रतिपादन केले. याप्रसंगी बाळासाहेब बनकर, चंद्रकांत खोडे, संजय मोरे, पंढरीनाथ देशमाने, ज्ञानेश्वर चव्हाण, राजेश पाटील, चंद्रकांत बनकर, अ‍ॅड.गीतेश बनकर, सुहास मोरे, सत्यभामा बनकर, किरण लभडे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या