संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील म्हसवंडी (Mhaswandi) येथील ब्राह्मणदरा डोंगराला भीषण आग (Brahmandara Mountain Fire) लागून एका गुराख्यासह दोन जनावरांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू (Cowherd Fire Death) झाल्याची घटना बुधवारी (दि.19) दुपारी घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत घारगाव पोलिसांकडून (Ghargav Police) मिळालेली माहिती अशी, म्हसवंडी येथील सीताराम तुकाराम जाधव (वय 53) हे मंगळवारी (दि.18) जनावरे चारण्यासाठी परिसरातील ब्राह्मणदरा डोंगरावर गेले होते. मात्र संध्याकाळ झाली तरी जाधव हे घरी न आल्याने त्यांच्या भावासह कुटुंबातील सदस्यांनी परिसरात शोध घेण्यास सुरूवात केली.
पण डोंगराला भीषण आग लागली होती. यामुळे पुन्हा ते बुधवारी सकाळी शोध घेण्यासाठी डोंगरावर गेले होते. तर समोर जाधव यांच्यासह दोन जनावरांचा होरपळून मृत्यू (Death) झाला होता. या घटनेची माहिती गावात समजताच ग्रामस्थांसह घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घुलेवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शिवाजी दत्तात्रय जाधव यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान या दुर्देवी घटनेने म्हसवंडी गावासह आजूबाजूच्या गावांमधील ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे.