Thursday, May 15, 2025
Homeमनोरंजन'ब्रह्मास्त्र'ने पहिल्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई

‘ब्रह्मास्त्र’ने पहिल्या दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

मुंबई | Mumbai

- Advertisement -

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt) ब्रह्मास्त्र चित्रपट काल थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी बक्कळ कमाई केली आहे..

अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र (Brahmastra) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box office) पहिल्या दिवशी तब्बल ३५ ते ३६ कोटींची कमाई केली आहे.

विशेष म्हणजे ब्रह्मास्त्र चित्रपटाने रणबीरच्या संजूलाही मागे टाकले असून संजू चित्रपटाने पहिल्या दिवशी ३४.७५ कोटींची कमाई केली होती.

तसेच ब्रह्मास्त्र या चित्रपटाने सर्व व्हर्जन मिळून ३५ ते ३६ कोटींची कमाई केली आहे. यात हिंदी व्हर्जनची कमाई ३२ ते ३३ कोटी आहे.

तर शनिवार आणि रविवार या दोन दिवशी लोकांना सुट्ट्या असल्याने चित्रपट हाऊसफुल चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्रह्मास्त्र हा चित्रपट हिंदी, मल्याळम, कन्नड, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...