Saturday, October 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBrain Eating Amiba : केरळमध्ये एका महिन्यात तिसरा बळी

Brain Eating Amiba : केरळमध्ये एका महिन्यात तिसरा बळी

नवी दिल्ली | New Delhi

केरळमध्ये मेंदू खाणार्‍या अमिबामुळे (Brain Eating Amiba) आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये (Kerala) हा प्राणघातक आजार वेगाने पसरत आहे. गेल्या महिन्यात या आजारामुळे 3 महिन्यांच्या मुलीसह 3 जणांचा मृत्यू (Death) झाला होता, त्यानंतर आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू (Death) झाला आहे.

- Advertisement -

ज्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोझिकोडमध्ये (Kozhikode) रतीश नावाच्या 45 वर्षीय व्यक्तीचा या आजाराने मृत्यू (Death) झाला. या वर्षी कोझिकोडमध्येच या आजाराने 4 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सरकारने जागरूकता मोहीम सुरू केली आहे आणि पाण्याचे क्लोरीनेशन करण्याचे काम सुरू आहे.

मेंदू खाणार्‍या अमिबाचा (Brain Eating Amiba) बळी ठरलेल्या रतीश नावाच्या 45 वर्षीय व्यक्तीचाही आज सकाळी मृत्यू झाला. रतीश कोझिकोड मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. त्याला खूप ताप आणि सर्दी होती. त्याच वेळी, रुग्णालयात दाखल करूनही, त्याची प्रकृती सुधारली नाही आणि अखेर तो मरण पावला आहे.

हा आजार कसा पसरतो ?
मेंदू खाणारा अमीबा हा अत्यंत प्राणघातक आहे. गोड्या पाण्याच्या संपर्कात येऊन, हा जीवाणू शरीरातून मेंदूवर हल्ला करतो. ज्यामुळे लोकांच्या जगण्याची शक्यता खूपच कमी होते. भारताव्यतिरिक्त, हा आजार इतर 20 देशांमध्ये आढळतो. गेल्या वर्षी केरळमध्ये मेंदू खाणारा अमीबाचे 36 रुग्ण आढळले होते. ज्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला होता.

ताज्या बातम्या

संपादकीय : १७ ऑक्टोबर २०२६ – विकासाचा वेग अन् महागाईचा आगडोंब

0
जागतिक स्तरावरील भू-राजकीय संघर्ष, बदलते हवामान आणि पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे यामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था अभूतपूर्व संकटातून जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतासारख्या उदयोन्मुख...