जळगाव jalgaon । प्रतिनिधी
आगामी काळात होणार्या निवडणुकांच्या (elections) पार्श्वभूमीवर संघटनेची पुर्नरचना (Organizational restructuring) करण्याच्यादृष्टीने जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (District Nationalist Congress) भाकरी फिरविली (Turned the bread) जाणार आहे. पुढील तीन ते चार महिन्यात जिल्ह्याच्या पक्षीय संघटनेत (party organization) मोठे बदल होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे (NCP leader MLA Eknathrao Khadse) यांनी ‘दै. देशदूत’शी बोलतांना दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला जिल्ह्यातून माजी प्रदेशाध्यक्ष अरूणभाई गुजराथी, राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे हे उपस्थित होते. यंदा नगरपरिषदा, जिल्हा परिषद, महापालिका या निवडणुका होणार आहे. तसेच पुढील वर्षी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होतील. या दृष्टीने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील हे नुकतेच जिल्हा दौर्यावर येऊन गेले.
या दौर्यात त्यांनी जळगाव येथे जिल्हा पदाधिकार्यांची बैठक घेऊन पक्ष संघटनेचा आढावा घेतला होता. त्यानंतर आज मुंबई येथे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत नाशिक येथे महाविकास आघाडीची उत्तर महाराष्ट्राची सभेविषयीच्या नियोजनावर चर्चा झाल्याची माहिती आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली. तसेच सदस्य नोंदणी वाढविण्याबाबतही चर्चा झाली असून संघटनेची पुर्नरचना करण्याच्यादृष्टीने जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्षांसह पदाधिकारी बदलविले जाणार आहे.
पुढीत तीन ते चार महिन्यात ही प्रक्रिया पुर्ण होणार असल्याचेही आमदार एकनाथराव खडसे यांनी सांगितले.