Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यापुढील आठवड्यात विधिमंडळाच्या अधिवेशनाला दोन दिवस सुट्टी

पुढील आठवड्यात विधिमंडळाच्या अधिवेशनाला दोन दिवस सुट्टी

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यातील पूरपरिस्थिती आणि पाऊस तसेच पुढील आठवड्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला ब्रेक देण्यात आला आहे. त्यानुसार आगामी आठवड्यात सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस कामकाज होणार नाही. त्यानंतर बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस कामकाज होऊन अधिवेशनाचे सूप वाजेल.

- Advertisement -

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारी यंत्रणा आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात व्यग्र आहे. परिणामी राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज, शुक्रवारी गुंडाळण्याचा सत्ताधारी पक्षाचा मानस होता. मात्र, विरोधी पक्ष काँग्रेसने अधिवेशन आटोपते घेण्यास विरोध केला होता. आधी निर्णय झाल्याप्रमाणे अधिवेशन ४ ऑगस्टपर्यंत चालवावे, असा काँग्रेसचा आग्रह होता.

या पार्श्वभूमीवर आज विधानभवनात संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आमदारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन पाऊसपाण्याच्या स्थितीची माहिती घेता यावी म्हणून ३१ जुलै आणि १ ऑगस्ट असे दोन दिवस अधिवेशनाला सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला. १ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्यानंतर पुढील तीन दिवस म्हणजे २, ३ आणि ४ ऑगस्टला अधिवेशनाचे कामकाज करण्याचे ठरविण्यात आले. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात या निर्णयाची माहिती दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या