अमळनेर –
तालुक्यातील मुंगसे गावातील६० वर्षीय महिलेचा कोरोना पॉझीटीव्ह अहवाल आल्याने मूंगसे गावासह सावखेडा दापोरी आणि रुंधाटी चारही गावांना सिल करण्यात आले. त्या गावांना आमदार अनिल भाईदास पाटील यांनी भेट दिली व पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात काय काय कमतरता आहे याचा आढावा घेऊन गावकऱ्यांना धीर दिला.
रात्री उशिरा मुंगसे गावातील महिला निष्पन्न झाल्याने प्रशासन रात्रीच सतर्क झाले रात्री बैठक झाली त्यात चार गावे सील करण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्रीच प्रशासन सतर्क झाल्याने चारही गावात सकाळी प्रशासन गतीने काम करू लागले. त्या चारही गावातील नागरिक कोरोना भीतीने भयग्रस्त झाले होते.
त्यांना आ.अनिल पाटील यांनी सरपंच पोलीस पाटील व कर्मचारी वर्गाला सोशल डिस्टनसिंग पाळत सूचना दिल्या. तीन दिवस घराबाहेर न पडता स्वतःची व आरोग्याची काळजी घेण्यासाठी धीर काढा घरातून बाहेर पडून प्रशासनावर ताण निर्माण होईल असे वागू नका असे आवाहन केले. काय काय दक्षता घेतली जात आहे याची पाहणी आमदार पाटील यांनी स्वतः केली.
तेथील गावाचे सर्वेक्षण सुरू असून गावातील सर्दी ताप खोकला अशा रुग्णांची यादी तयार करण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत कुलकर्णी, डॉ.संजय पाटील, डॉ शिल्पा बोरसे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेवक सेविका आशा वर्कर यांच्याकडून सर्व्हेक्षण सुरू केले आहे.
यावेळी पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन त्याठिकाणी काय आवश्यक आहे काय नाही याबाबत माहिती घेतली पुरेसा औषध साठा कोरोना सुरक्षेसाठी कोरोना प्रतिबंधक किट आहे की नाही याबाबत माहिती घेतली. आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी सॅनिटायझर मास्क हेड मास्क किट आहे का नाही याबाबत चौकशी केली. अद्याप येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुरक्षा किट उपलब्ध नसल्याचे यावेळी सांगण्यात आल्याचे समजते