Saturday, April 26, 2025
Homeजळगावभुसावळ : घरपोच भाजीपाला व फळे ; एसएसजीबी अभियांत्रिकीच्या अभियंत्यांनी बनवले ‘मीक्षा...

भुसावळ : घरपोच भाजीपाला व फळे ; एसएसजीबी अभियांत्रिकीच्या अभियंत्यांनी बनवले ‘मीक्षा अँप’

भुसावळ – प्रतिनिधी

येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी मितेश गुजर, सुरज पाटील व मृगेन कुलकर्णी व शेतकरी संघ दापोरी यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरू असताना नागरिकांच्या आरोग्यासाठी ‘मीक्षा अँप्स’ तयार करण्यात आले आहे.

- Advertisement -

या ॲपचे उद्घाटन जेष्ठ नागरिक शशिकांत वाघ, प्रा.धिरज पाटील, सुरज पाटील, मृगेन कुळकर्णी यांच्या हस्ते भुसावळात करण्यात आले. संचारबंदी असल्याने घरपोच भाजी, फळे देण्याची सुविधा जळगाव, एरंडोल नंतर भुसावळ शहरात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सुविधा उपलब्ध करून देतांना करोना विषाणू नियंत्रणाची सर्व नियम पाळले जाणार आहेत. भाजीपाला घरपोच प्राप्त करण्यासाठी इच्छुकांनी या ऍपद्वारे आपण ऑर्डर करावी. त्यासाठी काही नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत. ऑर्डरची रक्कम शक्यतो नेटबँकिंग, कार्ड, गूगल पे, फोन पे अथवा अन्य कोणत्याही क्यू आर कोडच्या डिजिटल पद्धतीने भाजीपाला डिलिव्हरीसाठी आल्यावर जमा करावे.

भाजीपाला डिलिव्हरीसाठी आल्यावर सर्वांनी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आपण ऑर्डर दिलेल्या भाजीपाल्याची डिलिव्हरी २४ तासांच्या आत देण्यासाठी प्रयत्न राहील असे मितेश गुजर याने सांगितले.

कोरोनाच्या काळात अत्यंत प्रभावी पणे काम करेल त्यामुळे बाजारातून भाजीपाला घेतांना अनेक ग्राहकांचा भाजीपाल्याला स्पर्श होतो तसेच लोकांची गर्दी झालेली दिसत आहे, अशा वेळेस संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो, कोरोनामुळे उद्भवलेल्या अशा गंभीर परिस्थितित भुसावळकरांना थेट घरपोच भाजीपाला आणि फळे तेही अत्यंत कमी भावात देण्याचे काम ही शेतकर्‍याची मुलं करता आहेत कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता करणार आहे. प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह, डीन डॉ.राहुल बारजिभे, विभागप्रमुख डॉ. पंकज भंगाळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

भारताच्या

Pahalgam Terror Attack: भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानच्या कुरापती सुरुच; सलग दुसऱ्या...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi पहलगाम दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर भारताने उचललेल्‍या कडक पावलामुळे पाकिस्‍तानची झोप उडाली आहे. पाकिस्‍तानच्या सैन्याने सलग दुसऱ्या दिवशी शस्‍त्रसंधीचे उल्‍लंघन केले...