Thursday, May 30, 2024
Homeजळगावचाळीसगाव : भडगाव येथील क्वॉरंटाई महिला जामडीला आलीच कशी? ; प्रशासनाचा गलथामपणा

चाळीसगाव : भडगाव येथील क्वॉरंटाई महिला जामडीला आलीच कशी? ; प्रशासनाचा गलथामपणा

क्वारंटाई १६ लोकांची आज स्वॅब घेणार

चाळीसगाव | प्रतिनिधी

- Advertisement -

चाळीसगाव येथून जवळच असलेल्या भडगाव करोनाबाधितच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या तालुक्यातील जामडी येथील ५८ वर्षीय महिला कोरोना बांधित झाल्याचे उघड झाले आहे.

कोरोनाबाधिताच्या अंत्ययात्रेत सहभागी झाल्यामुळे त्या महिलेला भडगाव येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. परंतू तरी देखील ती महिला रविवारी सायंकाळी जामडीत येवून गेल्याने तालुक्यात अप्रत्यक्षपणे कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ती महिला भडगाव येथे क्वारंटाईन असताना जामडी येथे आलीच कशी असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

यामुळे प्रशासनाचा गलथामपणा उघड झाला असून संबंधीतांवर कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान भडगाव येथून महिलेला जामडी येथे आननारे व कोरोबाधिताच्या अंत्ययात्रेसाठी गेलेले अशा जामडी येथील १६ जणांना आज प्रशासनातर्फे क्वारंटाईन करण्यात आले असून दुपारी सर्वाचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी धुळे येथे पाठविणार असल्याची माहिती वैद्यकिय आधिकारी डॉ.डी.डी.लांडे व डॉ.बी.पी.बाविस्कर यांनी दिली आहे. तसेच जामडी गावातील महिलेच्या घराचा परिसर देखील बंद करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या