Sunday, April 27, 2025
Homeजळगावचाळीसगाव : शनिवारी शनीमंदिरात चोरी ; लॉकडाऊनमध्ये दानपेटीचे लॉक तोडले

चाळीसगाव : शनिवारी शनीमंदिरात चोरी ; लॉकडाऊनमध्ये दानपेटीचे लॉक तोडले

चाळीसगाव । प्रतिनिधी

कोरोनात संपूर्ण चाळीसगाव लॉकडाऊन असतांना चोरांनी मात्र शहरातील दोन मंदिराच्या दान पेट्यांचे लॉक तोडून हजारो रुपयांच्या रक्कमेसह सोन्याचे दागिने लपास केल्याची घटना घडील शनिवारी उघडकीस आली आहे.

- Advertisement -

शहरातील दत्तवाडीतील भरवस्तीत पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘ शनिमंदिरात शनिवारी ’ मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मंंदिराचा दरवाजाचा कडीकोंडा तोडून आतील दानपेटी लांब घेवून जावून, त्यातील रक्कम लपास केली. तर शहरातील हनुमानसिंग नगर येथील कालीकाका माता मंदिराच्या दरावाजे कुलूप तोडून, दान पेटी फोडुन त्यातील रक्कम व देवीच्या अंगावरील सोन्याची नथ व मणीमंगळसुत्र अज्ञात चोरट्यांनी लपास केले आहे.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चाळीसगाव पोलिसांनी धाव घेत, पाहणी केली. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत, का याबाबतची माहिती पोलिसांनी जानून घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व जण घरी असल्याने आता चोरट्यांनी बंद मंदिरात चोरीसाठी मोर्चा वळवळ्याची चर्चा आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...