Tuesday, May 28, 2024
Homeजळगावचाळीसगाव : सोशल मिडीयावर यादी प्रसिद्ध झाल्यामुळेच शिवापुराच्या वृद्धाची आत्महत्या?

चाळीसगाव : सोशल मिडीयावर यादी प्रसिद्ध झाल्यामुळेच शिवापुराच्या वृद्धाची आत्महत्या?

चाळीसगाव | प्रतिनिधी

शहारातील गजनान हॉस्पीटलमध्ये गेल्या आठवड्यात आमोदा ता.नांदगांव येथील रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. पुढे तो नाशिक येथे तपासणीत कोरोना बांधित असल्याचे स्पष्ट झाले.

- Advertisement -

त्यामुळे गजानन हॉस्पीटल मधील डॉक्टरांसहीत स्टाप आणि तीन दिवसांत या रुग्णाल्यात वेगवेगळ्या उपचारासाठी आलेल्या रूग्णांपैकी काहींना क्वॉरंटाईन करीत, त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, ते सर्व अहवाल तपासणीत निगेटिव्ह आले.

दरम्यान तपासणीचा अहवाल प्राप्त होण्याआधीच व्हॉटअपच्या गृपवर या दवाखान्यात विविध उपचारासाठी येवून गेलेल्या रुग्णांची यादीच प्रकाशीत करण्यात आली होती.

तालुक्यातील शिवापूर येथील भरत घाटगे (६५) हा त्या काळात गजानन हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी येवून गेला होता, आणि त्याचेही नाव या यादीत आल्यानंतर त्याला गावकर्‍यांकडून मिळत असलेल्या वागणूकीला कंटाळून या वृध्दाने आलेल्या नैराश्यातून गळफास घेत आत्महत्त्या केल्याची गावात चर्चा आहे.

हि घटना १५ मे च्या मध्यरात्री घडली असून या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई होणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया या घटनेनंतर उमटत आहेत. कोरोना बद्दल माहिती प्रसारित करण्याचे आधिकारी नसतांना देखील चाळीसगावातील विविध व्हॉट्ऍप गृप कोरोना बद्दल दिवभरात विविध प्रकारच्या पोस्ट केल्या जात आहे.

तरी देखील प्रशासन हे बघ्याची भूमीक घेताना दिसूत आहे. एक व्हॉट्अप गृप बद्दल लोकांमध्ये कमालीचा संताप व्यक्त केला जात असून संबंधीत व्हॉट्अप गृप चाळीसगावचे प्रशासन चालवतो असा प्रश्‍न सुज्ञ नागरिकांडून उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या