Sunday, May 18, 2025
HomeधुळेBreaking # दोंडाईचात दोन्ही माजी मंत्र्यांवर गुन्हे दाखल

Breaking # दोंडाईचात दोन्ही माजी मंत्र्यांवर गुन्हे दाखल

धुळे/दोंडाईचा Dhule /Dondaicha । प्रतिनिधी

- Advertisement -

दसर्‍याच्या (Dasara) दिवशी रावण दहणाच्या (Ravana’s burning) कार्यक्रमात अडथळा (obstruction) निर्माण करुन दहशत (terror) माजविली. आदिवासी समाजातील (tribal society) काही जणांना जाणीवपूर्वक चिथावणी (Provocation) देवून हे कृत्य केल्याचा आरोप (Accusation) करीत माजी मंत्री डॉ.हेमंत देशमुख (Former Minister Dr. Hemant Deshmukh) माजी नगराध्यक्ष रविंद्र देशमुख यांच्यासह 25 ते 30 जणांविरुध्द गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे. राजकीय हेतूने (political purposes) हे कृत्य केल्याचेही बोलले जाते आहे.

आरडीएमपी माध्यमिक विद्यालयाचे रामनाथ भगवान मालचे (वय 42 रा. दोंडाईचा) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, दि.5 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास येथील कश्मीर्‍या मारोती मंदिरासमोरील शिक्षण महर्षी दादासाहेब रावल नॉलेज सिटीच्या मैदानावर रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा डॉ.हेमंत भास्कर देशमुख, डॉ.रविंद्र देशमुख, अमित पाटील, रविंद्र जाधव, नंदु सोनवणे, युवराज सोनवणे, भारत सोनवणे, अंकुश सोनवणे, नागेश मालचे, अर्जुन मालचे यांनी आदिवासी भिल्ल समाजाच्या लोकांना चिथावणी दिली.

त्यामुळे त्यांचा जमाव जमवून त्यांच्यासह 25 ते 30 जणांनी रावण दहनाच्या ठिकाणी येवून आरडाओरड करीत दहशत निर्माण केली. रावन दहन करायचा नाही, रावण आमचे आदिवासी भिल्ल समाजाचे पुर्वज आहेत, असे बोलून पटांगणातील 30 हजार रूपये खर्चाचा फटाके व शोभेची दारू भरून उभारलेल्या रावणाची प्रतिकृती खाली पाडून तोडून नुकसान केले.

दहशत निर्माण करून कार्यक्रम होवू दिला नाही. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करीत पळून गेले.

त्यानुसार दोंडाईचा पोलीस ठाण्यात भादंवि 153 अ, 295अ 120 ब, 117, 143, 147, 148, 427 महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 51 चे कलम 37 (1)(3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोहेकाँ पीएसआय शरद लेंडे करीत आहेत.

रावण दहनाच्या निमित्ताने आ.जयकुमार रावल यांनी आदिवासी समाजाबद्दल अपशब्द वापरुन आमची बदनामी केली. जातीवाचक शिविगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा आशयाची तक्रार दोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल झाली असून आ.रावल यांच्यासह त्यांचे वडील सरकारसाहेब रावल आणि इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारदार अंकुश मंगलसिंग नाईक (वय 29 रा.टेकभिलाटी, दोंडाईचा) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आ.जयकुमार रावल व त्यांचे वडील सरकार साहेब रावल (जितेंद्रसिंग रावल), निखील राजपुत, नरेंद्र गिरासे, चिरंजीवी चौधरी, रामकृष्ण मोरे, नारायण बाजीराव पाटील, प्रविण महाजन, नरेंद्र भाऊसाहेब राजपुत व इतर 15 ते 20 जणांनी कश्मीर्‍या मारोती मंदिराच्या मोकळ्या जागेत फिर्यादी हे साक्षीदारासंह रावण दहन कार्यक्रमाबाबत विचारण्यास गेल्याचा राग येवून त्याला जातीवाचक बोलून आदिवासी समाजाला हिणविण्याचे काम केले.

तसेच तुम्हाला सोडणार नाही, अशी जिवे मारण्याची धमकी दिली. म्हणून आ.रावल, सरकारसाहेब रावल यांच्यासह 9 संशयीतांवर अनुसुचित जाती, जमाती, अत्याचार प्रतिबंध अधिनियम कायदा कलम 37 (1)(आर)(एस) तसेच 506 प्रमाणे मध्यरात्री 2.9 मिनिटांनी गुन्हा दाखल झाला असून तपास एसडीपीओ प्रदीप मैराळे हे करीत आहेत.

वादाची ठिणगी दसर्‍याच्या दिवशी सायंकाळी रावण दहणाच्या निमित्ताने पडली. काही तरुणांनी रावण दहनाला विरोध केल्यामुळे त्याठिकाणी आ.रावल यांनी जावून भाषण केले. त्यात आदिवासी समाजाबद्दल आणि आपल्या राजकीय विरोधकांबद्दल अपशब्द वापरल्याची चर्चा पसरली.

काहींनी यासंदर्भातले व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केलेत. मात्र रावल गटाने जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल केल्याचे डॉ.देशमुख गटाचे म्हणणे आहे.

रावण दहनाचे निमित्त, दोन्ही गटातील वाद मात्र जुनाच

रावण आमचा पुर्वज आहे, त्याचे दहन करुन नका असे सांगणार्‍या आदिवासी तरुणांनी हा शोध कसा व कुठून लावला. हा संशोधनाचा भाग आहे. मात्र रावण ब्राह्मण असल्याने आपल्या समाजाशी त्याचा काहीही संबंध नाही असे स्पष्टीकरण आदिवासी एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक मोरे यांनी दसर्‍याच्या सायंकाळी उशिरा केला. यामुळे या वादावर पडदा पडेल असा सार्‍यांचा समज होता.

मात्र रावण दहण हे केवळ निमित्त असून दोंडाईचातील दोन्ही गटात जुनेच वैमनस्य आहे. दोंडाईचा शहरातील टेक भिलाटी परिसरात तत्कालीन नगराध्यक्ष गुलाबसिंग सोनवणे यांनी घरकुल योजनेचे काम हाती घेतले तेव्हा देखील डॉ.देशमुख आणि आ.रावल गटात वादाची ठिणगी पडली.

त्यावेळी हे प्रकरण थेट न्यायालयात पोहचले. मात्र या दोन्ही गटातील टोकाचे राजकीय वैमनस्य पाहता वादासाठी कोणतेही निमित्त कारणीभूत ठरते. आता नगरपालिका निवडणूक समोर असल्याने हा वाद देखील धार्मिक नसून राजकीय असल्याचीच सर्वत्र चर्चा आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पावसाची आकडेवारी चार दिवसांपासून गायब

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या आठ दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात भाग बदलत अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. अनेक तालुक्यात वादळासोबत जोरदार पर्जन्यवृष्टी झालेली आहे. मात्र, कोणत्या तालुक्यात...