Saturday, March 29, 2025
Homeधुळेधक्कादायक : धुळे : प्रेत अर्धवट जाळून नातेवाईक पसार

धक्कादायक : धुळे : प्रेत अर्धवट जाळून नातेवाईक पसार

धुळे –

शहरातील एका प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीच्या भावाचा मृत्यू झाल्यानंतर देवपूर अमरधाममध्ये प्रेत अर्धवट जाळून नातेवाईक पसार झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

मृत व्यक्ती कोरोनाबधित असल्याचे नंतर निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली असून आज तक्रारीनंतर अर्धवट प्रेताला पुन्हा जाळण्यात आले.

शरहाराच्या आमदाराशी संबंधित 44 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्य झाल्यानंतर काल पुन्हा एकदा राजकीय व्यक्तीच्या भावाचा मृत्यू झाला, हृदयविकाराने हा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आल्यानंतर मात्र त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. तोवर त्या व्यक्तीच्या अंतिम संस्कारासाठी मोजकेच नातेवाईक देवपूर येथील अमरधाम मध्ये पोहचले होते.

त्यांनी घाई घाईत प्रेत अर्धवट जाळून तेथून काढता पाय घेतला. आज सकाळी ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी या भागाचे माजी नगरसेवक कैलास चौधरी यांना ही गंभीर बाब कळताच श्री.चौधरी हे अमरधाम मध्ये पोहचले. त्यांनी तात्काळ पालिका आयुक्तांशी संपर्क साधून घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले.

तसेच कोरोना बाधित मृतांची वेगळी व्यवस्था करण्याचे सांगत जनतेच्या जीवाशी खेळू नका, आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना तशा सूचना करा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. तसेच परिसरातील नागरिकांना संयम ठेवण्याचे सांगून घरात राहण्याचे आवाहन केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २९ मार्च २०२५ – वल्लीमध्ये जीवन। नाना फळीफुली जीवन।

0
वसुंधरेच्या जीवसृष्टीतील झाडांचे महत्त्व सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मानवी मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. झाडे तोडणे मानवी हत्येपेक्षाही गंभीर आहे अशी टिप्पणी केली आहे....