Tuesday, June 17, 2025
Homeजळगावbreaking # अमळनेरात उष्माघाताचा पहिला बळी

breaking # अमळनेरात उष्माघाताचा पहिला बळी

अमळनेर Amalner

मे हिटमध्ये (May hit) सूर्य आग (sun burns) ओकत असताना अमळनेरात एका विवाहित महिलेचा (married woman) उष्माघाताने (heat stroke) बळी ( Victim) गेल्याची घटना आज 12 रोजी तांबेपुरा भागात घडली.

- Advertisement -

VISUAL STORY # मानसी नाईक पुन्हा नववधू ?

रुपाली गजेंद्रसिंग राजपूत (वय 33) असे मयत महिलेचे नाव असून सदर महिला अमरावती येथे विवाह सोहळ्यानिमित्त गेली होती. 11 रोजी सायंकाळी ती रेल्वेने परत आल्यानंतर ऊन लागल्याने तिला अचानक मळमळ व उलट्या सुरू झाल्या. यामुळे तिच्या पतीने तांबेपुरा येथेच एका खासगी डॉक्टरांना दाखवले असता त्यांनी ऊन लागल्याचे सांगत गोळ्या औषधे देऊन प्राथमिक उपचार केले.

पाचोर्‍यात पहाटेचा थरार : अन् क्षणात चौघांना चिरडलेजळगावच्या म्हाळसेची ही आहे VISUAL STORY, स्टोरीत नथीचा नखरा करतोय सर्वाना घायाळ

थोडावेळ महिलेला बरेही वाटले. मात्र, सकाळी उठल्यानंतर पुन्हा उलट्या, मळमळ, भोवळ सुरू झाल्याने घरच्यांनी सकाळी 10.30 वाजता तत्काळ रिक्षा करून शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

VISUAL STORY : टॉपची बटणं खुली ठेवून यलो स्कर्टमध्ये प्रियंकाच्या कातील अदा

अमळनेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताडे यांनी महिलेचे शवविच्छेदन केले. याबाबत अमळनेर पोलिसात महिलेचे दीर दीपक राजपूत यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. सदर मृत्यू उष्माघातानेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरण

महिलेच्या पश्चात पती, सासू सासरे, दीर असा परिवार असून गजेंद्र उर्फ अतुल मंगलसिंग राजपूत यांच्या त्या पत्नी तर मंगलसिंग राजपूत यांच्या मोठ्या सून होत्या.

दरम्यान, घटना लक्षात घेता भरउन्हात विवाह सोहळ्यास जाणे शक्यतोवर टाळावे, असा सल्ला वैद्यकीय अधिकार्‍यांनी देत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

VISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर… काळीज होईल खल्लास…

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

चीफ

मोठी बातमी! इस्राईलचा इराणला आणखी एक दणका; चीफ ऑफ आर्मी स्टाफ...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi इस्राइल आणि इराण यांच्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संघर्षात दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात इस्राइलने इराणमधील...