Sunday, April 27, 2025
Homeजळगावचाळीसगाव – देवळी : निर्जंतुकीकरण कक्षाची स्थापना करणारी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत

चाळीसगाव – देवळी : निर्जंतुकीकरण कक्षाची स्थापना करणारी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत

चाळीसगाव | प्रतिनिधी

देशासह जगभरात कोरोना विषाणूमुळे हाहाकार उडालेला असताना कोरोना च्या प्रदूर्भावापासून आपले गाव सुरक्षित राहावे म्हणून चाळीसगाव तालुक्यातील देवळी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.

- Advertisement -

गावातील तरुणांनी स्वयंसेवक म्हणून जबाबदारी घेत गावात बाहेरून येणार्‍यावर लक्ष ठेवले जात असून यात अजून एका उपक्रमाची भर पडली आहे. ग्रामपंचायतीने स्वखर्चातून गावात बाहेरून येणार्‍या व्यक्तींसाठी तालुक्यातील पहिले निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी केली आहे.

चाळीसगाव तालुक्यात प्रथमच यापद्धतीने निर्जंतुकीकरण व्यवस्था देवळी ग्रामपंचायतीने केली असल्याने या अभिनव उपक्रमाची पाहणी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी देवळी येथे भेट देत पाहणी केली व त्यांनी ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतुक केले.

गावात येणार्‍या दोन प्रवेशद्वारांवर ही व्यवस्था करण्यात आली असून त्याठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यामार्फत देखरेख केली जाणार आहे.सदर निर्जंतुकीकरण साठी सॅनीटायझिंग लिक्विड वापरले जाणार असल्याची माहिती ग्रामसेवक एस.के.तेली यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

IPL 2025 : आज डबल हेडर; ‘हे’ संघ भिडणार, उपांत्य फेरी...

0
मुंबई | Mumbai इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (रविवारी) दोन सामने खेळविण्यात येणार आहेत. यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ...