Monday, April 28, 2025
Homeजळगावजळगाव : डांभुर्णी येथील खून प्रकरणातील संशयीत आरोपीची चौकशी

जळगाव : डांभुर्णी येथील खून प्रकरणातील संशयीत आरोपीची चौकशी

जळगाव | प्रतिनिधी
यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील अल्पवयीन दहावीचा विद्यार्थी कैलास चंद्रकांत कोळी याच्या खून प्रकरणातील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने डांभुर्णी शिवारात पकडले.

पोलीस गाडीवर दगडफेक
त्यास जळगावला आणत असताना मृत तरुणाच्या संतप्त नातेवाईकांनी पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग केला. नातेवाईकांचा संयम सुटून त्यांनी ममुराबाद जवळ पोलिसाच्या वाहनाला अडवत त्यावर दगडफेक केली. परंतु, पोलीस संशयित आरोपीला अगोदरच्या वाहनात घेवून पुढे निघून गेले होते. त्यास जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे.

- Advertisement -

या खूनप्रकरणाचा उलगडा होण्यासाठी संशयित आरोपीची चौकशी अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपअधीक्षक डॉ.निलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहम, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अकबर पटेल करीत आहेत.

दरम्यान, कैलास कोळी याच्या खूनप्रकरणातील संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळताच कैलासच्या नातेवाईकांचा संतप्त जमाव एकत्र आला. हा आक्रमक जमाव बघून पोलीस संशयित आरोपीला यावल पोलीस ठाण्यात न घेवून जाता, त्यास थेट जळगावला घेवून आले. परंतु, २५ ते३० नातेवाईक त्यांच्या मोटारसायकलने वाहनाचा पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच पोलिसांचे चार-पाच वाहने अतिशय जलद गतीने जळगावकडे निघाले.

ममुराबाद गावाजवळ पोलिसांच्या वाहनाचा वेग कमी झाला. परंतु, मागील वाहनाला गावापासून निघण्यास काही वेळ लागताच संतप्त नातेवाईकांनी या वाहनास हेरले आणि त्यावर दगडफेक केली. यात वाहनाचे नुकसान झाले आहे. तर संशयित आरोपीला काही पोलीस अगोदरच्या वाहनात घेवून जळगावकडे निघून गेले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...