पाचोरा – प्रतिनिधी
- Advertisement -
अंशिका अमोल पाटील रा. नगरदेवळा होळ (ता.पाचोरा) या विद्यार्थिनीने भारतीय प्रज्ञा शोध (आयटीएस) परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिलविला.
अंशिका हि होळ येथील जिल्हा परिषद शाळेची इ. ३ री ची विद्यार्थिनी असून तीने आयटीएस या परीक्षेत २०० पैकी १९८ गुण प्राप्त करून राज्यात दुसरा क्रमांक मिळवून नावलौकीक वाढविले आहे.
याबद्दल पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी तिचे कौतुक केले. अंशिका ही पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अमोल पाटील यांची मुलगी आहे. याप्रसंगी सहा.पोलीस निरीक्षक गणेश चौबे, विकास पाटील, पो.कॉ.अमोल पाटील व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
भारतीय प्रज्ञा शोध परीक्षेत १९८ गुण संपादन केल्याबद्दल अंशिकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.