Saturday, April 26, 2025
Homeजळगावयावल-भुसावळ रस्त्यावर लुटमार करणारे गजाआड ; यावल पोलीसांची कामगीरी

यावल-भुसावळ रस्त्यावर लुटमार करणारे गजाआड ; यावल पोलीसांची कामगीरी

यावल – प्रतिनिधी

यावल पासून अंदाजे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या यावल भुसावळ रोडवर पाटाच्या चारी ते पेट्रोल पंप दरम्यान दरोडा टाकून लुटण्याच्या उद्देशाने तयारी करून हातात शस्त्र घेऊन आढळून आलेल्या एकूण सहा आरोपींना यावल पोलिसांनी दि.16 गुरुवार रोजी सकाळी दोन ते तीन वाजेच्या सुमारास रंगेहात पकडले आरोपी भुसावल यावल रोड वरील तापी नदी पुलाजवळ असलेल्या पोलीस चौकी जवळील तसेच टोलनाक्याजवळ असलेल्या रमाबाई आंबेडकर नगर (अकलुद ता.यावल) मधील असल्याने यावल भुसावल तालुक्यासह संपूर्ण भुसावळ विभागात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

दरोडेखोर आरोपी पकडले गेल्याने यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व यावल पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. अंजाळे घाटात गेल्या पंधरा दिवसात रस्ता लुटीचे दोन प्रकरणे झाली आहेत गेल्या काही दिवसापूर्वी आठ ते दहा गाड्या अंजाळे घाटात अडवण्यात येऊन पन्नास ते साठ हजार रुपयांची रोकड ड्रायव्हर कडून घेण्यात आली होती मात्र एकाही गाडीवाल्याने तक्रार न दिल्यामुळे गुन्हा नोंद झाला नव्हता तसेच साखळी येथील सय्यद अजहर सय्यद लियाकत हे त्यांच्या गाडी m.p.0 9 O981 वरून भुसावळकडे जात असताना दि.5 एप्रिल 20 रोजी रात्री त्यांच्या खिशातील 3000 रुपये हिसकावून घेतले होते व गाडीवर दगडफेक केली होती.

याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल असून त्यात जीवन धनजे कन्हैया सपकाळे राहुल कोडी विजय पाचपांडे यांना अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे सध्या कोरूना विषाणू व्हायरसच्या बंदोबस्तासाठी पोलिसांना बंदोबस्ताचा जो ताण येत आहे याचा गैरफायदा घेत अशा परिस्थितीत आज दि.16 एप्रिल 2020 गुरुवार रोजी सकाळी २.४५ वाजता यावल पोलीस निरीक्षक अरूण धनवडे पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय देवरे व त्यांचे सहकारी पोलीस मित्र यावल भुसावळ रोडवर गस्त घालीत असताना यावल भुसावल रोड वरील पाटाच्या चारी जवळील घोडे पिर बाबा दर्गाचे दरम्यान यावल शहरापासून अंदाजे तीन किलोमीटर अंतरावर दरोडा टाकून लुटण्याच्या उद्देशाने तयारी करून हातात कुर्‍हाड, चाकू, सुरा, लाकडी दांडे, दोरी, मिरची पावडर इत्यादी साहित्यासह मनोज रमेश सपकाळे वय 20, गोलू उर्फ धम्मरत्न दिगंबर धुरंदर वय 18, विशाल भाऊलाल साळवे वय 19, गणेश उर्फ अजय जनार्दन सोनवणे वय 19, संदीप आत्माराम सपकाळे वय 21, शिव हरी बागडे वय 18, हे एकूण सहा संशयित दरोडखोरआरोपी मिळून आले.

सर्व सहा आरोपी हे भुसावल येथील तापी नदी पुलाजवळील टोल नाका व पोलिस चौकीजवळ असलेल्या भुसावल यावल रोडवरील रमाबाई आंबेडकर नगर अकलूज तालुका यावल येथील आहेत, रमाबाई आंबेडकर नगर पासून अंजाळे घाट हा दोन-तीन किलोमीटर अंतरावर आहे, तसेच रमाबाई आंबेडकर नगरपासून भुसावळ यावल रोडवर पाटाच्या चारी जवळ अंदाजे 10 ते 12 किलोमीटर अंतरावर लुटण्याच्या प्रयत्नात होते सहा दरोडेखोरांना यावल पोलिसांनी ताब्यात घेतल्याने संपूर्ण भुसावळ विभागात यावल पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.

सदर घटनेबाबत यावल पोलिसांशी संपर्क साधताच यावल पोलीस स्टेशनचे पीएसआय जितेंद्र खैरनार, सुनीता कोळपकर, सहाय्यक फौजदार कैलास चव्हाण, मुजफ्फर खान ,हेडकॉन्स्टेबल असलम खान, संजय तायडे, पोलीस कॉन्स्टेबल सुशील घुगे, राजेश महाजन, निलेश वाघ, संदिप भोई, सतीश भोई इस्‍माईल तडवी तात्काळ घटनास्थळ गाठले आणि वरील आरोप इतरांकडून मुद्देमालासह पकडून यावल पोलीस स्टेशनला आणले.

वरील सहा आरोपी विरुद्ध हेड कॉन्स्टेबल संजय देवरे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनला भाग 5 गु. र. नं. 66 /2020 भा.द.वि. कलम 399 सह शस्त्र अधिनियम 4 / 25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय.सुनिता कोळपकर या करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...