रावेर | प्रतिनिधी
करोना लढ्यात लोकप्रतिनिधी काय करत आहे याकडे संपूर्ण मतदार संघाचे लक्ष लागून आहे.शुक्रवारी खासदार रक्षा खडसे यांनी रावेर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायती,ग्रामीण रुग्णालय,पोलीस स्टेशन व नगर पालिका,पंचायत समिती व प्राथमिक आरोग्य केंद्र यासाठी ७१५ लिटर सॅनीटायझर,मास्क उपलब्ध करून दिले आहे.
येथील पंचायत समितीत शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील व पंचायत समिती सभापती जितु पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काही ग्रामपंचायतीला प्रातिनिधिक स्वरुपात सॅनीटायझर वाटप करण्यात आली.
वाटपाप्रसंगी अध्यक्षा रंजना पाटील म्हणल्या कि,कोरोना लढ्यात खासदार रक्षाताई मतदार संघाच्या परिस्थितीबाबत लक्ष ठेवून असून,त्यांच्या माध्यमातून कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा परिषद,पंचायत समिती काम करत आहे.याकाळात अनेक गोर गरिबांना त्यांनी जेवण पुरवून जणमाणसाच्या कल्याणाचा वसा घेतलेले दिसत आहे.
महिला खासदार म्हणून त्यांचे काम कौतुकास्पद आहे. खा.रक्षा खडसे यांनी रावेर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायती व ग्रामीण रुग्णालय,पोलीस स्टेशन,नगरपालिका,बँका,तहसील कार्यालय,पंचायत समिती,प्राथमिक आरोग्य केंद्र याकार्यालयांना सॅनीटायझर व कीट पुरवली आहे.
शुक्रवारी रावेर पंचायत समितीत आलेले साहित्य जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील व पंचायत सभापती जितु पाटील यांच्या हस्ते सोशल अंतर पाळून, तालुक्यातील ऐनपूर सरपंच योगिता भिल्ल व केऱ्हाळे सरपंच राहुल पाटील,रसलपूर सरपंच, तांदलवाडी ग्रामपंचायत यांना प्रातिनिधिक स्वरुपात सॅनीटायझर कॅन वाटप करण्यात आले.उर्वरित ग्रामपंचायतीने पंचायत समितीशी संपर्क साधून आपापल्या गावाकरिता आलेले साहित्य घेवून जावे असे आवाहन सभापती जितु पाटील यांनी केले आहे.
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष राजन लासूरकर,पंचायत समिती उपसभापती पी.के.महाजन,पंचायत समिती सदस्य जुम्मा तडवी,संदीप सावळे,गटविकास अधिकारी सोनिया नाकोडे उपस्थित होते.पंचायत समिती साहित्य वाटपानंतर पोलीस स्टेशन,ग्रामीण रुग्णालय व पालिकेला सभापती,उपसभापती व मान्यवर यांच्या हस्ते सॅनीटायझर वितरण करण्यात आले.