Saturday, May 4, 2024
HomeजळगावBreaking # अपात्र नगरसेवक भगत बालाणींनी रचले राजीनामा नाटयाचे कुंभाड

Breaking # अपात्र नगरसेवक भगत बालाणींनी रचले राजीनामा नाटयाचे कुंभाड

जळगाव jalgaon

शहर महानगरपालिकेचे ( jalgaon City Municipal Corporation) भाजपाचे गटनेते (Group leader of BJP) भगत बालाणीं (Bhagat Balani) यांनी मंगळवारी नगरसेवक पदाचा राजीनामा (Resignation) दिला. परंतू दिलेला हा राजीनामा प्रशासन आणि नागरीकांची दिशाभूल करणारा असल्याची माहिती माजी नगरसेवक चेतन शिरसाळे यांनी दिली. मुळात जात पडताळणी समितीने (Caste Verification Committee) भगत बालाणी यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करून त्यांना अपात्र (Disqualified) ठरविले होते. असे असतांना त्यांनी राजीनामा नाटयाचे कुंभाड रचत प्रशासनाकडून आदेश देवूनही बालाणींना प्रशासनाकडून बालाणी यांना अभय दिले जात असल्याचा आरोप चेतन शिरसाळे यांनी केलेला आहे.

- Advertisement -

Breaking # जळगाव महापालिकेत भाजपला धक्का : गटनेते भगत बालाणीचे नगरसेवक पद धोक्यात

माजी नगरसेवक चेतन शिरसाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहर महानगरपालिकेच्या सन २०१८ च्या निवडणुकीत भाजपाचे भगत बालाणी हे १६-अ मधून ओ.बी.सी. राखीव गटातून निवडून आले. त्यांनी निवडणुकीवेळी सादर केलेले जात वैधता प्रमाणपत्राला औरंगाबाद खंडपीठात माजी नगरसेवक चेतन शिरसाळे यांनी आव्हान दिले होते. खंडपीठाचे न्या.एस.व्ही.गंगापुरवाला आणि न्या.एस.जी.दिघे यांच्या न्यायासनाने त्यावर सुनावणी घेवून दि.०९ फेब्रुवारी २०२२ मध्ये निकाल देत हे प्रकरण जात पडताळणी समितीच्या माध्यमातून चौकशी करून चार महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.

Big Breaking # अबब… अख्खे कार्यालय अडकले ‘एसीबी’च्या जाळ्यात

या वेळी ऍड.वसंत एस.भोलाणकर यांनी जात पडताळणी समितीमध्ये चेतन शिरसाळे यांच्या वतीने भक्कम बाजू मांडली. या आदेशानुसार जात पडताळणी समितीचे अध्यक्ष गुलाबराव खरात यांनी चौकशी करून सुनावणी घेत दि.७ नोव्हेंबर २०२२ रोजी भगत बालाणी यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द केले. तसेच समितीने निवडणुक निर्णय अधिकारी तथा आयुक्त यांना भगत बालाणी यांनी खोटया ओ.बी.सी. जात प्रमाणपत्राच्या माध्यमातून घेतलेले लाभ अधिनियम २००० चे कलम १० अन्वये तात्काळ काढून घेण्याचे आदेश दिले होते. तसेच आतापर्यंत घेतलेल्या मानधनाची वसुली करावी. याबाबत कायदेशिर कार्यवाही करण्याचेही सुचित करण्यात आले होते.

कारवाई टाळण्यााठी रचले नाट्य

या प्रकरणी कारवाई टाळण्यासाठी भगत बालाणी यांनी जातप्रमाणपत्राद्वारे घेतलेला लाभ, आतापर्यंतचे मानधाचा घेतलेला लाभ वसुल करण्याची कारवाई टाळण्यासाठी राजीनामा नाटय रचून आरोप चेतन शिरसाळे यांनी केला आहे. प्रशासनाबद्दलचा विश्वास सर्वसामान्य जनतेत कायम रहावा व आयुक्त पदाची गरीमा राखली जावी यासाठी आयुक्तांनी भगत बालानी यांचा खोटा राजीनामा स्विकारण्याऐवजी त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणीही माजी नगरसेवक शिरसाळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

आयुक्तांकडे बालाणींनी दिला राजीनामा

महापालिकेचे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे सकाळी भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यात मी माझ्या स्वःइच्छेने नगरसेवक पदाचा राजीनामा देत आहे. तो स्विकारावा असे राजीनामा पत्र आयुक्तांना दिले आहे. आयुक्तांनी राजीनामा स्विकारला असून अपात्रबाबत राज्यशासन, निवडणूक आयोगाला यापूर्वीच अहवाल पाठविला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या