नंदुरबार | प्रतिनिधी –
नंदुरबार जिल्ह्यात अजुन २ रुग्ण करोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यात अक्कलकुवा व शहादा येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या आता १३ झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात १२ दिवसापुर्वी कोरोनाचा एकही रूग्ण नव्हता. मात्र, आता पॉझिटीव्ह रूग्ण आढळत असल्याने ग्रीन झोन मध्ये असलेला जिल्हा रेड झोन कडे वाटचाल करु लागला आहे.
अक्कलकुवा येथील एक पुरुष (५८) आणि शहादा येथील एक मुलगी (१५) अशा दोघांचे स्वॅबचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. शहादा येथील मुलगी दोन दिवसापूर्वी अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आली होती.जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या १३ झाली आहे.
यात नंदुरबारातील ४ , शहादा येथील ५ तर अक्कलकुवा येथील ४ रूग्णांचा समावेश आहे. यात शहादा येथील एकाच मृत्यू झाला आहे. ५२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.