Saturday, May 4, 2024
Homeजळगावनंदुरबार : तळोदा नगरपालिकेचा निर्णय एका रात्रीतून फिरतो तेव्हा ; भाजीपाला...

नंदुरबार : तळोदा नगरपालिकेचा निर्णय एका रात्रीतून फिरतो तेव्हा ; भाजीपाला मार्केट स्थलांतर

तळोदा | श. प्र.

कोरोना आजाराची खबरदारी म्हणून शहरातील भाजीबाजार हा हातोडा रस्त्यावरील मिल आवारात भरविण्याचा निर्णय काल तळोदा नगरपालिकेने घेतला होता.त्यानुसार भारत ऑईल मिल येथे जागेचे रेखांकन देखील करण्यात आले होते व दुकाने आखून देण्यात आल्या होत्या. मात्र पालिका प्रशासनाकडून संपूर्ण शहरातील मोक्याच्या जागा सोडून शहराच्या शेवटी येणाऱ्या ऑईल मिल कंपाऊंड परिसरात भाजीपाला मार्केट भरविण्याचा निर्णय घेतला होता त्याला भाजीपाला व्यापारी व नागरिकांच्या सोशल मीडियावर विरोध झाला. याची दखल घेऊन आज सकाळी प्रशासनाने तात्काळ मीटिंग घेत या निर्णयावर पुनर्विचार करीत शेवटी हा भाजीबाजार भारत ऑइल मिल एवजी तळोदा बस स्थानक परिसरात भरवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.

- Advertisement -

 दरम्यान काल घेतलेल्या निर्णयाविरोधात नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून उमटल्या,तळोदा पालिका प्रशासनाकडून भाजीबाजार हा चुकीच्या ठिकाणी हलविला जात असल्याने स्थानिक व्यापारी व नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत होती त्यातून हा बदल करण्यात आल्या असल्याचे समजते.

नगराध्यक्ष यांचे निवासस्थानी तात्काळ मीटिंग

यासंदर्भात तळोदा नगरपालिका प्रशासन व तळोदा तहसीलदार,भाजीपाला व्यापारी व तळोदा नगराध्यक्ष अजय परदेशी यांची नगराध्यक्ष यांच्या निवासस्थानी आज सकाळी तात्काळ बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्वंकष विचार विचार करून नागरिकांच्या व्यापाऱ्यांच्या होणारा विरोध लक्षात घेता चर्चेअंती भाजीपाला बाजार हा बस स्थानक आगार परिसर येथे भरविण्यात यावा असे ठरविले गेले. बस स्थानक आगार परिसर हा शहराच्या दृष्टीने सर्वांसाठी तसेच भाजी विक्रेते व ग्राहक यांच्यासाठी देखील सोयीचे ठरणार आहे. तळोदा शहरातील नागरिक तसेच नवीन वसाहतींमधील नागरिक या सर्वांना मध्यवर्ती स्थान म्हणून तळोदा आधार परिसर हा सर्व दृष्टीने योग्य असल्याचे या बैठकीतून ठरविण्यात आले.यावेळी सर्वांनी अधिकारी वर्गाने निर्देशित केलेल्या आदर्श शिस्तीत सुरक्षित अंतर ठेवून आपापले भाजीपाल्याचे दुकान लावण्याच्या संदर्भात घालून देण्यात आलेले नियम सुरक्षितपणे पाळून व्यवसाय करावा असे आवाहन देखील करण्यात आले.
तळोदा नगराध्यक्ष अजय परदेशी

तळोदा पालिका प्रशासनाकडून भाजीबाजार हा भारत ऑईल मिल कंपाऊंड येथे भरविण्यात येण्याबाबत जरी निर्णय घेण्यात आला होता तरी भाजीपाला व्यापारी व नागरिकांच्या होणारा विरोध लक्षात घेता सर्वांच्या सोयीने मध्यवर्ती ठिकाणी असलेले बस स्थानक परिसर निवडण्याबाबत आज नगराध्यक्ष यांचे घरी मीटिंग घेण्यात आली व सर्वसंमतीने तळोदा शहराचा विचार करता मुख्याधिकारी तळोदा नगरपालिका यांच्याशी चर्चेअंती तळोदा नगराध्यक्ष उदय परदेशी व आम्ही हा निर्णय लोकहिताच्या दृष्टीने घेतलेला आहे तरी नागरिकांनी सोशल डिस्टस्टिंग पाळावे व प्रशासनाने आखून दिलेल्या शिस्तीचे पालन करावे.

पंकज लोखंडे, तहसीलदार तळोदा

- Advertisment -

ताज्या बातम्या