Monday, April 28, 2025
Homeनंदुरबारनंदुरबार : दारू पिवून येणार्‍या बापाचा मुलाने केला खून

नंदुरबार : दारू पिवून येणार्‍या बापाचा मुलाने केला खून

नंदुरबार | प्रतिनिधी

अक्कलकुवा तालुक्याती डाबचा देवकेलीपाडा येथे दारू पिवून येणार्‍या वडीलांना मुलाने डेगार्‍याने मारहाण करून त्यांचा खून केला. याप्रकरणी पोलीसांनी त्याला अटक केली आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील डाबचा दिवकेलीपाडा येथे जात्र्या मारग्या वसावे (६५) रा.डाबचा देवकेलीपाडा (ता.अक्कलकुवा) हे दारू पिवून घरी आल्याने त्याचा राग येवून त्यांचा मुलगा बोंडा जात्र्या वसावे याने त्यांना लाकडी डेंगार्‍याने मारहाण करून दुखापत केली.

त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालय नंदुरबार येथे दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जंगल्या जत्र्या वसावे रा.डाबचा देवकीपाडा (ता.अक्कलकुवा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोलगी पोलीस ठाण्यात बांडा जत्र्या वसावे याचा विरूध्द भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला पोलीसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी पुढील तपास पोसई राजेश पाटील करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २८ एप्रिल २०२५ – ही सामूहिक जबाबदारी

0
तापमानाच्या वाढत्या पार्‍याबरोबर राज्याच्या धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. राज्यात सुमारे तीन हजार छोटे-मोठे जल प्रकल्प आहेत. सद्यस्थितीत त्या प्रकल्पांमध्ये सुमारे छत्तीस टक्के...