Thursday, May 15, 2025
Homeजळगावचांगली बातमी : शहादा येथील एक रुग्ण करोनामुक्त

चांगली बातमी : शहादा येथील एक रुग्ण करोनामुक्त

नंदुरबार – प्रतिनिधी

- Advertisement -

काल नंदुरबारातील चार रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्यापाठोपाठ आता शहादा येथील ५२ वर्षीय रुग्णदेखील कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे आता १९ पैकी पाच जण कोरोनामुक्त झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.

आता जिल्हयात फक्त १३ कोरोनाबाधीत रुग्ण आहेत. जिल्हयात दि.१७ एप्रिलपासून आजपर्यंत एकुण १९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात शहादा येथील ९, नंदुरबार तालुक्यातील सहा, तर अक्कलकुवा येथील ४ रुग्णांचा समावेश आहे.

यात शहादा येथील एक रुग्ण दगावला आहे. तर काल दि.६ मे रोजी नंदुरबारातील प्रभाग क्रमांक १० मधील पहिले चार कोरोनाबाधीत रुग्ण कोरोनावर मात करुन पूर्णपणे बरे झाले आहेत. काल त्यांना जिल्हा रुग्णालयातून घरी सुटी देण्यात आली आहे.

दरम्यान, शहादा येथील ९ पैकी एका ५२ वर्षीय रुग्णादेखील कोरोनावर मात केली असून तो पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. त्याच्यावर नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याचे शेवटचे दोन कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

त्यामुळे आता जिल्हयात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १३ आहे. १९ पैकी शहादा येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर नंदुरबार येथील चार व शहादा येथील एकाने कोरोनावर विजय मिळविला आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करु लागला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वादळी पावसात पत्र्याचे शेड कोसळले; एक जण जखमी

0
  येवला| प्रतिनिधी Yeola शहर व परिसरात आजही, गुरुवारी (दि. १५) दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याने शहरातील गंगा दरवाजा भागात पत्र्याचे शेड...