Thursday, January 8, 2026
Homeदेश विदेशBreaking News: दिल्लीतील संसद भवनाबाहेर एकाने स्वतःला घेतले पेटवून; पोलिसांना घटनास्थळी सापडली...

Breaking News: दिल्लीतील संसद भवनाबाहेर एकाने स्वतःला घेतले पेटवून; पोलिसांना घटनास्थळी सापडली अर्धवट जळालेली चिठ्ठी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
देशाची राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीतील संसद भवनासमोर एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी वेळीच धाव घेत सदर व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले आहे. व्यक्तीची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहे. पोलिसांना घटनास्थळावर पेट्रोलची बाटली मिळाली आहे. त्याचबरोबर पोलिसांना घटनास्थळावर एक दोन पानांची चिठ्ठी मिळाली आहे. ती अर्धवट जळाली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने संसदेबाहेर येत स्वत:वर अंगावर ज्वलनशील द्वाव्य टाकून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. संबंधित घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आंदोलक नेमका कोण होता? त्याने असे का केले? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. दरम्यान, संबंधित व्यक्तीने स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर संसदेबाहेरील पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. या घटनेत संबंधित व्यक्ती जखमी झालीय. त्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

https://twitter.com/ANI/status/1871874520136700116

YouTube video player

या व्यक्तीने रेल्वे भवनाजवळील पार्कमध्ये आधी पेटवून घेतले आणि नंतर तो संसद भवनाकडे धावत सुटला होता. संसद भवनापर्यंत येईपर्यंत पोलीस आले. यावेळी संसद भवन बाहेर असलेल्या पोलिसांनी त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकले. त्याला लागलेली आग विझवण्याचे तातडीने शर्थीने प्रयत्न करण्यात आले. ती आग विझल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आता पोलिसांकडून सखोल तपास सुरु आहे.

दरम्यान, या व्यक्तीजवळ एक दोन पानी अर्धवट जळालेली चिठ्ठी सापडली आहे. पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली असून, आता प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव जितेंद्र असून, तो उत्तर प्रदेशातील बागपेटचा आहे. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, याचाही तपास सुरू केला आहे.

ताज्या बातम्या

Parner : पंतप्रधान संग्रहालयात अण्णांचा पत्रव्यवहार

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कार्याची दखल आता पंतप्रधान संग्रहालयाने घेतली असून अण्णांनी सरकार दरबारी केलेला पत्रव्यवहार जतन केला जाणार आहे....