Monday, March 31, 2025
Homeजळगावभुसावळ : डंबरच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू : एकास अटक

भुसावळ : डंबरच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू : एकास अटक

भुसावळ  –

शेतात जाणार्‍या वृद्धाचा डंपरच्या धडकेने जागीच मृत्यू झालल्याची घटना तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथील बोदवड रोडवरील मारोती मंदीरासमोर दि.१६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमरास घडली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद तुळशिराम पाटील (६५, कुर्‍हे पानाचे) हे मुलगा किशोर सोबत सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेताकडे पायी जात असतांना गावाजवळील कुर्‍हे-बोदवड रस्त्यावरील मारोती मंदिरापुढे गावाकडे येणारा भरधाव डंपर एम.एच.१९ झेड.४४२७ ने धडक दिल्याने प्रल्हाद पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरुन पसार झाला. घटनेची माहिती मिळताच  ग्रामस्थांनी अपघातस्थळी गर्दी केली. याबाबत किरण प्रल्हाद पाटील (कुर्‍हे पानाचे) यांच्या फिर्यादीनुसार आरोपी डंपर चालक मयूर गंगाधर फालक (रा.साकेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीसह डंपर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तपास हवालदार युनूस शेख करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sonia Gandhi: “भारतातील शिक्षण व्यवस्थेची हत्या थांबवा”; सोनिया गांधींनी केंद्र सरकारला...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiकाँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भारताच्या शिक्षण धोरणावरुन मोदी सरकारवर शाब्दीक हल्ला चढवला आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय...