Saturday, May 4, 2024
Homeजळगावचोपडा : मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात ; आठ हजारांची लाच भोवली

चोपडा : मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात ; आठ हजारांची लाच भोवली

चोपडा – प्रतिनिधी
चोपडा शहराचे मंडल अधिकारी राजेंद्र आधार वाडे हे आपल्या पंटर समाधान रमेश मराठे याचे हस्ते रू.आठ हजाराची लाच स्विकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकले. ही कारवाई दि.७ फेब्रुवारी रोजी रात्री करण्यात आली.

चोपडा तहसिल कार्यालय अंतर्गत चोपडा शहरात मंडल अधिकारी म्हणून कार्यारत असलेले राजेंद्र आधार वाडे रा.आंबेडकर नगर चोपडा यांनी तक्रारदार यांचेकडून ट्रॅक्टर वाळू वाहतूकी दरम्यान कारवाई न करण्याच्या मोबदल्यात दरमहा ८००० हजार रूपये लाचेची मागणी केली होती.

- Advertisement -

आरोपी लोकसेवक यांनी पंचांसमक्ष पहीला हप्त्याची रक्कम आरोपी मंडळ अधिकारी यांचे खाजगी पंडर आरोपी क्र.२ – समाधान रमेश मराठे व्यवसाय हातमजुरी, रा.पाटील गढी चोपडा यांचेकडे देण्यास सांगितल्याने सदर रक्कम पंटर यांनी स्विकारली. ही कारवाई चोपडा शहरात करण्यात आली.

ही कारवाई पो.अधि. ला.प्र.वि.नाशिकचे सुनिल कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली डी.वाय.एस.पी. जी.,म.ठाकूर, पीआय निलेश लोधी, पीआय संजोग बच्छाव, सहा.पा.उ.नि. रवींद्र माळी, पो.हे.कॉ.अहीरे, सुरेश पाटील, सुनिल पाटील, पो.ना.मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्दन चौधरी, प्रशांत ठाकूर, प्रविण पाटील, नासिर देशमुख, महेश सोमवंशी, ईश्वर धनगर ला.प्र.वि.जळगाव यांचे पथकाने ही कारवाई केली.

एकाच आठवड्यात लाच स्विकारताना संशयत आरोपींना पकडण्याची एसीबी पथकाची ही दुसरी कारवाई आहे. दोन-तीन दिवस अगोदर नायब तहसिलदार यांना अटक केली होती. लाच स्विकारण्याच्या या प्रकरणांमुळे चोपडा महसुलचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या