Saturday, May 4, 2024
Homeजळगाव#Breaking #फरकांडे येथील कापूस व्यापाऱ्याची चाकूने हत्या

#Breaking #फरकांडे येथील कापूस व्यापाऱ्याची चाकूने हत्या

फरकांडे Farkande/ जळगाव jalgaon

पाळधी तालुका एरंडोल येथील तिरुपती पाईप कंपनी (Tirupati Pipe Company) जवळ अज्ञात टोळक्याने (unknown group) केलेल्या चाकू हल्ल्यात (Knife attack) फरकांडे येथील तरुण कापूस व्यापाऱ्याचा (Young cotton trader) मृत्यू (death) झाला ही घटना आज रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव स्वप्नील रत्नाकर शिंपी (Swapnil Ratnakar Shimpi) वय 32 हे आहे.

- Advertisement -

स्वप्नील व त्याच्या सहकारी दिलीप राजेंद्र चौधरी उर्फ गुड्डू चौधरी वय 34 वर्षे यांच्यासोबत कापूस व्यापाराचे पैसे घेण्याकरता गेला त्यांच्या होंडा सिटी कारणे क्रमांक M H 01A L71 27 या कारणे जळगाव येथे व्यापाराची रक्कम घेण्यासाठी गेले होते त्याच्याजवळ पंधरा ते वीस लाख रुपये घेऊन येत असताना त्यांना तिरुपती पाईप कंपनी जवळ आले असता मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात चार ते पाच जणांच्या टोळक्याने कारला कट मारला म्हणून वाद घातला तेव्हा दिलीप उर्फ गुड्डूने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला

मात्र त्या हल्लेखोरांनी स्वप्निल ला कार मधून बाहेर खेचले व त्याच्या पाठीवर व मांडीवर धारदार चाकूने वार केले त्या झटापटीत दुसऱ्या हल्लेखोरांनी दिलीप च्या हातात असलेली पैशांची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला

मात्र दिलीपच्या प्रतिकारामुळे हल्लेखोरांना अपयश आले. व त्यांच्यात व दिलीप मध्ये होत असलेल्या झटापटीत व दिलीप च्या आवाजामुळे समोरील पेट्रोल पंपावरील चार ते पाच लोक त्यां दोघांच्या मदतीला धावून आले ते लोक येत असल्याचे पाहून हल्लेखोर सावध झाले त्यांनी दिलीपला व पैसे सोडून पसार झाले मात्र स्वप्नील हा या हल्लेखोरांच्या दगड व विटाच्या साह्याने हल्लेखोरांचा विरोध करत पाळधीच्या दिशेने मदत मिळवण्यासाठी धावण्याचा प्रयत्न करीत होता

मदतीला धावून आलेल्या लोकांच्या सहकार्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संस्थेच्या रुग्णवाहिकेतून स्वप्नील शिंपी यांना जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र स्वप्निल वर हल्ला मोठ्या प्रमाणात झालेली असल्यामुळे त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले त्याच्या पश्चात आई-वडील व पत्नी एक मुलगी असा परिवार आहे स्वप्निल व दिलीप हे घरातले एकुलते एक व कर्ते होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या