Saturday, November 23, 2024
Homeधुळेधुळे : फागणे येथील भाजप कार्यालयाची तोडफोड

धुळे : फागणे येथील भाजप कार्यालयाची तोडफोड

धुळे (प्रतिनिधी) –

धुळे तालुकातील फागण गावत  भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

काल दि.८ रोजी झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुक निकालात भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार अरविंद जाधव हे सर्वाधिक मतानी निवडून आले, याचा राग येऊन पराभूत झालेले उमेदवार यांनी मध्यरात्री भारतीय जनता पार्टीचे फागणे येथील संपर्क कार्यालयात तोडफोड केली.

या तोडफोडीत कार्यालयातल्या खुर्च्या, विज मिटर, पक्षाचे झेंडे, कार्यालयातील पंखे तसेच समोर स्टेसबँकचे एटीएमची तोडफोड केलेली आहे.

भारतीय जनता पार्टीचे लोकनियुक्त सरपंच गोकुळ सिगवी फिरायला जात असताना त्यांच्या कार्यालयावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा त्यांनी पाहणी केली व त्यांचे भाऊ किशोर सिगवी यांना फोन करून सांगितले की, आपल्या कार्यालयाची तोडफोड झालेली आहे.

आजूबाजूला विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मध्यरात्री साडेबारा एक वाजता अज्ञात व्यक्तीकडून कार्यालयातील तोडफोड करण्यात आलेले आहे.

किशोर सिगवी यांनी सांगितले की, पराभूत झालेले उमेदवारसह सहकारी यांच्या नावाने तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. पीआय दीपक गांगुर्डे व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व पंचनामा करायला सांगितला असून पोलीस कार्यवाही सुरू आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या