एरंडोल (प्रतिनिधी) –
श्रीक्षेत्र पद्मालय येथील गणपती मंदिराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून दानपेटी फोडून सुमारे 35 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना दिनांक 25 डिसेंबर रात्री घडली 26 डिसेंबर रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
नुकतेच ऊस कामगार ठेकेदाराचे तीन लाख रुपये रोकड लंपास केल्याची घटना ताजी असतानाच परत ही घटना घडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 25 डिसेंबर रोजी रात्री पद्मालय येथील मंदिरात विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे नेमक्या याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात ठेवलेली दान पेटी उचलून बाहेर नेली व सदर दानपेटी फोडून दानपेटीतील पस्तीस ते चाळीस हजार रुपयांची रोकड लंपास केली.
बापू सुका कोळी हा रात्री गस्त ड्युटीवर होता या ठिकाणी असलेल्या दगडी जात्या जवळच्या गेटवर धुडकू यादव मोरे हा सेवेत होता 26 डिसेंबर रोजी पहाटे सात वाजेच्या सुमारास देवालयाचे पुजारी यांची पत्नी शारदा वैद्य या मंदिरात गेल्या असता मंदिराचा दरवाजा उघडा दिसला व त्यांना मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले त्यातील दोन दानपेटीचे कुलूप तोडलेले आढळून आले.
याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला पद्मालय देवस्थानचे विश्वस्त एडवोकेट आनंदराव पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून पोलीस स्टेशनला भाग 5 भारतीय दंड संहिता कलम 457 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक धर्मेंद्र ठाकूर जुबेर खाटीक चंद्रकांत पाटील हे करीत आहे