Monday, April 28, 2025
Homeजळगावजळगावला कोरोना विषाणू तपासणी प्रयोग शाळेस मंजूरी

जळगावला कोरोना विषाणू तपासणी प्रयोग शाळेस मंजूरी

जळगाव | प्रतिनिधी

जळगावात ‘कोविड १९’ विषाणू तपासणी प्रयोगशाळेस महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यासाठी आवश्यक बाबींची चाचपणी सुरू असून लवकरच जळगावात कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळा सुरू होईल. यी प्रयोगशाळेत फक्त करोनाचीच नव्हेतर भविष्यात उद्भवणार्‍या कुठल्याही ही विषाणूच्या संसर्गाचे संशोधन व निदान करता येईल, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी दिली.

- Advertisement -

याबाबतचे पत्र महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे कार्यासन अधिकारी अमू डहाळे यांनी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या संचालकांना पाठवले आहे. या पत्रामध्ये जळगावसह अंबाजोगाई, कोल्हापूर, बारामती, गोंदिया, नांदेड येथेही कोविड १९ तपासणीसाठी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा स्थापित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

जळगाव येथे यासाठी आवश्यक जागा उपलब्ध असून दोन-चार दिवसात आवश्यक यंत्र स्थापित केल्यानंतर प्रयोगशाळा सुरू होईल, असेही डॉ. खैरे यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...