Monday, April 28, 2025
Homeजळगावजळगाव : कोरोनामुळे १५ एप्रिलपर्यंत जिल्हा सीमा बंदी कायम

जळगाव : कोरोनामुळे १५ एप्रिलपर्यंत जिल्हा सीमा बंदी कायम

जळगाव | प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सीमा बंदी १५ एप्रिलला रात्री १ वाजेपर्यंत कायम ठेवण्यात आलेली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.

राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हीड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ दि.१३.३.२०२० पासुन लागू करुन खंड १,३ व ४ मधील तरतुदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. जळगाव शहरात कोरोना (कोव्हीड-१९) विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणू्न नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात ३१ माच पर्यंत सीमा बंदी लागू करण्यात आली होती.

- Advertisement -

शासनाने १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण राज्यात बंदी (लॉक डाऊन) लागू करण्यात आली असल्याने तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता व त्यात वाढ होऊ नये म्हणून दि.२३ मार्च रोजी सीमा बंदी केलेली होती. ही सीमा बंदी १५ एप्रिल पर्यंत रात्री १ वाजेपर्यंत कायम ठेवण्यात आलेली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी दिले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...