Wednesday, May 29, 2024
Homeजळगावजळगाव : जिल्ह्यात सात करोना बाधित रूग्णांची भर ; बाधित रूग्णांची संख्या...

जळगाव : जिल्ह्यात सात करोना बाधित रूग्णांची भर ; बाधित रूग्णांची संख्या झाली २४४

जळगाव –

जळगाव शहरात आज दोन रूग्णांचा करोनाचा अहवाल पाॅझिटीव्ह आल्यानंतर जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 98 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 91 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून सात व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

- Advertisement -

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील पिप्राळा, सम्राट कॉलनी, सिंधी कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे तीन, भुसावळ येथील दोन, भडगाव येथील एक व खामगाव, जि. बुलडाणा येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत करोना बाधित रूग्णांची संख्या 244 इतकी झाली असून त्यापैकी 45 व्यक्ती करोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत तर तीस करोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या