Sunday, March 30, 2025
Homeजळगावजळगाव (बांभोरी) : मोटरसायकल अपघातात काका-पुतण्या ठार

जळगाव (बांभोरी) : मोटरसायकल अपघातात काका-पुतण्या ठार

रवंजे, ता.एरंडोल (वार्ताहर) –

जळगाव बांभोरी जवळील जैन पाईप कंपनी समोर आज दि.२० रोजी सकाळी मोटरसायकल अपघातात खडके-रवंजे (ता.एरंडोल) येथील काका-पुतण्या ठार झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

सविस्तर असे की, खडके रवंजे, ता.एरंडोल येथील रहीवाशी महेश पोपट तायडे (वय ३२) व त्यांच्या भावाचा मुलगा (पुतण्या) जयवंत उर्फ (सोनू) नाना तायडे (वय १६) हे बांभोरी येथे महेश तायडे यांची बहीण नलूबाई हिचे सासरे नामदेव सिताराम नन्नवरे मयत झाल्याने त्यांच्या अंत्ययात्रेसाठी बांभोरी येथे जात असताना जैन पाईप कंपनी समोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.

महेश तायडे हा जळगाव येथील नरेंद्र कापड दुकानात कामाला होता तो रवंजे येथून रोज बसने ये-जा करत होता. मात्र आज बहीणीचे सासरे वारल्याने त्यांच्या अंत्ययात्रेसाठी पुतण्याला सोबत घेवून बांभोरी येथे येत असताना हा अपघात घडला.

पुतण्या जयवंत (सोनू) हा दहावीत शिक्षण घेत होता. महेश पोपट तायडे यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. तर जयवंत उर्फ सोनू याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.

या दुर्दैवी घटनेने खडके गावावर शोककळा पसरली असून अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांसह गावकऱ्यांनी जळगाव जिल्हा रूग्णालयात मोठी गर्दी केली असून काका-पुतण्याचा मृतदेह बघून सर्वांनीच आक्रोश केला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : साईंच्या पादुका बाहेर नेण्यास काही ग्रामस्थांचा विरोध तर काहींचा...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi येथील साईबाबांच्या मुळ चर्म पादुका साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने 10 एप्रिलपासून दक्षिण भारतात नेण्याचा निर्णय घेतला आहे. पंधरा दिवसात पादुका दोन...