तरसोद, ता.जळगाव –
‘कोरोना’ रोगप्रसारक जीवाणु फैलावाचे पार्श्वभूमीवर धोक्याची शक्यता लक्षात घेऊन संपूर्ण देशभरात कडकडीत बंद पाळला जात आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तरसोद (ता.जि.जळगाव) तर्फे दि.28 मार्च रोजी संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणी निर्जंतूकीकरण फवारणी करण्यात आली. फवारणी होण्याआधी संपूर्ण गावात दवंडीद्वारे आवाहन करून प्रत्येकाने घरात रहावे, बाहेर येऊ नये असे आवाहन केले. यानंतर सर्व गावभर निर्जंतुकीकरण फवारणी औषध फवारण्यात आले. यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.पदाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल यांचेसह सुशील पाटील, पोलीस पाटील गोकुळ शिरूड, मनोज काळे, ग्रा.पं.कर्मचारी राहुल पाटील आदींनी सहकार्य केले.
- Advertisement -