Saturday, April 26, 2025
Homeजळगावजळगाव : डांभुर्णी येथील त्या विद्यार्थ्यावर अंत्यसंस्कार

जळगाव : डांभुर्णी येथील त्या विद्यार्थ्यावर अंत्यसंस्कार

यावल – प्रतिनिधी
तालुक्यातील डांभुर्णी येथे काल दि.३ रोजी दहावीची परिक्षा देत असलेला विद्यार्थी कैलास चंद्रकांत कोळी (वय १६) याच्या डोळ्यात तीक्ष्ण जखमा करून डोक्यावर मार देऊन त्याची निर्घुण हत्या केली. त्या विद्यार्थ्यावर आज दि.४ रोजी डांभुर्णी येते अत्यंत शोकाकूल वातावरणात कलम १४४ चे पालन करत अत्यंत कमी फक्त नातेवार्सकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्या घटनेतील आरोपीचा छळा लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने कालपासूनच प्रयत्न केले व आज त्यांना यश आले व या विद्यार्थ्याचा खून करणारा संशयीत आरोपी हा सुपडू रमेश सोळंके राहणार कोळन्हावी यांच्या शेतात लपून बसला होता.

- Advertisement -

या संशयीत आरोपीचे नाव यश पाटील असून त्यास यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, हवलदार संजय सपकाळे, विकास सोनवणे यांच्या पथकाने पकडून अटक केली. पोलिसांनी आरोपी तास शोधण्यासाठी धरणगाव, चोपडा, एरंडोल, जळगांव, तालुक्यात पथके पाठवलेली होती. घटनास्थळी जळगाव येथून अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, फैजपूर विभागाचे डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी भेट देवून घटनेचा गंभीर गुन्हा लक्षात घेता पोलीस विभागाला आरोपीस तत्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...