Sunday, September 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBreaking News : दिंडोरीत विहिरीत कार कोसळून नऊ जणांचा मृत्यू; दरगोडे कुटुंबीयांवर...

Breaking News : दिंडोरीत विहिरीत कार कोसळून नऊ जणांचा मृत्यू; दरगोडे कुटुंबीयांवर काळाचा घाला

- Advertisement -

दिंडोरी | प्रतिनिधी Dindori

आज दिनांक ३ एप्रिल २०२६ रात्री दहा वाजेच्या सुमारास दिंडोरी शहरात कार क्रमांक MH15-JS-1053 विहिरीत कोसळली. या अपघातात कार मधील ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान अपघातानंतर स्थानिक नागरिक व प्रशासनाकडून बचाव कार्य सुरु करण्यात आले होते.

कार विहिरीतून बाहेर काढल्यानंतर कार मध्ये एकूण नऊ जण असल्याची माहिती मिळते. कार मधील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.मृतांची नावे सुनील दत्तू दरगोडे, राखी सुनील दरगोडे, उषा अनिल दरगोडे, श्रद्धा अनिल दरगोडे श्रावणी अनिल दरगोडे अशी आहेत ( एकूण पाच नावे उपलब्ध झाली आहेत).

प्रथम दर्शनी मिळालेल्या माहीत्ती नुसार वरील सर्व जण दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील रहिवासी असल्याचे समजते. ते सर्व एका खाजगी क्लासच्या कार्यक्रमास गेले होते अशी माहिती समजते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कर्जमाफी पुन्हा अडखळली!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जदार शेतकर्‍यांसाठी दोन स्वतंत्र याद्यांमधून कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. बँकेच्या वतीने...