Tuesday, November 26, 2024
Homeमुख्य बातम्याअखेर महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता मिळाला! विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब

अखेर महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता मिळाला! विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब

मुंबई । Mumbai

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पक्षातील आमदारांना घेत सामील झाले होते. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याआधी अजित दादांकडे विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद होतं, मात्र पवार सरकारमध्ये गेल्यावर या पदावर संख्याबळानुसार काँग्रेस पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद गेलं होतं. पंरतु अधिवेशन सुरू झालं तरी काही काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं नव्हतं. अशातच काँग्रेसकडून विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता पद काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांना देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. विधीमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडेच राहणार आहे. बाळासाहेब थोरात यांना हा निर्णय दिल्ली हायकंमाडने कळवला आहे. त्याचबरोबर आता महाराष्ट्राच्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदी विजय वड्डेटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर पक्षाने हा निर्णय घेतला आहे. या पदासाठी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या तीन बड्या नेत्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र काँग्रेस हायकमांडकडून अचानक विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या