Saturday, November 23, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यपाल अ‍ॅक्शन मोडमध्ये; सरकारकडे केली 'ही' मागणी

राज्यपाल अ‍ॅक्शन मोडमध्ये; सरकारकडे केली ‘ही’ मागणी

मुंबई । Mumbai

शिवसेना नेते (Shiv Sena leader) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला असून महाविकास आघाडी सरकार ((mahavikas aaghadi government) अल्पमतात आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने निर्णय घेण्याचा धडाका लावत ३ दिवसांमध्ये १६० जीआर काढले होते. यानंतर भाजप नेते (bjp leader) प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी या निणर्यावर आक्षेप घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर आता राज्यपालांनी (Governor) या जीआरची माहिती राज्य सरकारकडून मागवली आहे…

- Advertisement -

राज्यपालांनी या पत्रात घाई -घाईने मंजूर केलेल्या जीआरबाबत मुख्यमंत्री (cm) ठाकरेंना विचारणा केली आहे. २२ ते २४ जून या तीन दिवसांच्या कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या सर्व जीआरची सविस्तर माहिती राज्यपालांनी मागवली असून राज्याच्या मुख्य सचिवांना याबाबत राज्यपालांनी सूचना केल्या आहेत. आता मुख्य सचिव यावर काय माहिती देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

दरम्यान, प्रवीण दरेकरांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, राज्यात सरकार अस्थिर झाल्याचा फायदा घेत सत्ताधाऱ्यांनी घाईघाईत असंख्य शासन निर्णय काढून कोट्यवधींचे जीआर मंजूर करुन घेतले आहेत. सरकारकडून ज्या घाईने हे जीआर काढण्यात आले आहेत यात काहीतरी संशयास्पद आहे. त्यामुळे या कालावधीत मंजूर केलेले जीआर तात्काळ रोखावेत असे दरेकर यांनी पत्रात म्हटले होते. परंतु त्यावेळी राज्यपाल करोनाग्रस्त (corona) असल्यामुळे त्यावर कोणताही निर्णय झाला नव्हता. अखेर करोनावर मात करुन राज्यपाल कोश्यारी राजभवनात (Raj Bhavan) परतताच अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या