पुणे । Pune
ज्येष्ठ लेखक व कादंबरीकार अनंत उर्फ नंदा खरे (Nanda Khare) यांचे वयाच्या ७६ या वर्षी आज पुण्यात (Pune) दीर्घ आजाराने निधन झाले. खरे यांच्या निधनामुळे साहित्य विश्वामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे…
नंदा खरे यांना मराठी साहित्यातील (Marathi literature) विविध प्रांतात मोलाची भर घालणारे विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टीचा पुरस्कार करणारे लेखक म्हणून ओळखले जात होते. ‘अंताजीची बऱखर (Antaji’s Barkhar) ‘उद्या’, ‘बखर अंतकाळाची’ या त्यांच्या कादंबऱ्या (Novels) वाचकप्रिय झाल्या. मानवाच्या जडणघडणीचा साद्यंत अभ्यास करून त्यांनी सिद्ध केलेला ‘कहाणी मानवप्राण्याची’ हा ग्रंथ त्यांच्या वैचारिक लेखनाची ओळख घडवणारा ठरला आहे.
दरम्यान, खरे यांना ‘उद्या’ नावाच्या कादंबरीसाठी २०२० साली साहित्य अकादमीचा पुरस्कार (Sahitya Akademi Award) जाहीर झाला होता. परंतु त्यांनी मला समाजाने आतापर्यंत खूप काही दिले असे म्हणत हा पुरस्कार नाकारला होता. अलिकडेच त्यांची ‘नांगलल्यावीन भूई’ ही कादंबरी प्रकाशित झाली होती.