Tuesday, March 25, 2025
Homeदेश विदेशBadrinath Glacier Collapse : बद्रीनाथमध्ये हिमकडा कोसळला, ५७ कामगार दबले

Badrinath Glacier Collapse : बद्रीनाथमध्ये हिमकडा कोसळला, ५७ कामगार दबले

दिल्ली । Delhi

मागील काही दिवसांपासून उत्तराखंडमधील हवामान सातत्याने बदलत आहेत. हिमालयीन भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. तर सखल भागात जोरदार पाऊस कोसळत आहे.

- Advertisement -

दरम्यान, शुक्रवारी दुपारी बर्फवृष्टीमुळे येथे मोठी दुर्टना घडली. मुसळधार बर्फवृष्टीनंतर हिमकडा कोसळला. यामुळे ५७ कामगार बर्फाखाली गाडले गेले. आतापर्यंत १० कामगारांना वाचवण्यात यश आले आहे.

प्रशासन आणि बीआरओ टीमला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोद सुमन यांनी सांगितले की, बर्फ पडल्यानंतर ५७ कामगार गाडले गेले. तथापि, १० जणांना वाचवण्यात यश आले आहे.

अपघाताच्या वेळी एका खाजगी कंत्राटदाराचे कामगार मोठ्या संख्येने घटनास्थळी काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्वजण बीआरओ कराराखाली काम करणाऱ्या कंत्राटदाराचे कामगार होते. जेव्हा हिमस्खलन झाले तेव्हा सर्वजण इकडे तिकडे धावू लागले. त्यापैकी काही जण वाचण्यात जाण्यात यशस्वी झाले, तर ५७ कामगार बर्फात अडकले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...