Tuesday, May 21, 2024
Homeजळगावपारोळा : धुळपिंप्री येथे इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

पारोळा : धुळपिंप्री येथे इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

पारोळा – प्रतिनिधी

तालुक्यातील धुळपिंप्री येथील एका 38 वर्षीय इसमाने त्याच्या राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.13 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

सुधीर दगडू पाटील (वय 38) हा दि.13 रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास त्याच्या स्वतःच्या शेतात पाणी सोडण्यासाठी गेला होता व शेतातून घरी परत आल्यानंतर त्याने घराचा आतून दरवाजा बंद करून घेतला त्याच्या नातेवाईकांनी आवाज दिला परंतु त्याने आतून काही एक प्रतिसाद दिला नाही म्हणून घराचा दरवाजा तोडून पाहिले असता त्याने घराच्या छताला लोखंडी पाईपास सुती दोरीने बांधून गळफास घेतला असल्याचे दिसले.

त्यास उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले असता डॉ.योगेश साळुंखे यांनी त्यास मयत असल्याचे घोषित केले. मयत सुधीर हा दुबई रिटन होता.

मयताच्या खिशात सापडली चिट्ठी
या चिठ्ठीमध्ये मी स्वतःहून आत्महत्या करीत आहेत याच्यात कोणाच्या दोष नाही, कर्जामुळे दारुमुळे मी जेवण नव्हतो करत माझ्याकडून पैसे आहेत म्हणून मी त्याग करत आहे मी दहा दिवसापासून हा प्रयत्न करत होतो पण हिंमत होत नव्हती शेवट करावीच लागली असे या चिठ्ठीत लिहिले आहे.

याबाबत सुनील दगडू पाटील रा.धुळपिप्रि यांनी पारोळा पो.स्टे.ला खबर दिल्यावरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल रवींद्र रावते हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या